*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
मुंबई 09 एप्रिल)शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने पक्षप्रमख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने पक्षाच्या प्रवक्तेपदाच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. यात संजय राऊत आणि अरविंद सावंत यांची मुख्य प्रवक्तेपदी निवड करण्यात आली आहे. तर इतर सहा जणांवर प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
यामध्ये शिवसेना नेते अॅड. अनिल परब, खासदार आणि पक्षाच्या उपनेता प्रियंका चतुर्वेदी, जनसंपर्कप्रमुख अॅड. हर्षल प्रधान, उपनेता सुषमा अंधारे, आनंद दुबे आणि जयश्री शेळके यांचा समावेश आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली.
शिवसेना ठाकरे गटाने जाहीर केलेल्या पत्रात नेमकं काय?
उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने पक्षाच्या प्रवक्तेपदाच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. यात मुख्य प्रवक्तेपदी शिवसेना नेते खासदार संजय राऊत आणि खासदार अरविंद सावंत यांची नियुक्ती करण्यात आली असून इतर सहा जणांवर प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. शिवसेना पक्षाची भूमिका प्रसारमाध्यमांमध्ये मांडण्यासाठी त्यांना अधिकृत करण्यात आले आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली. यासोबतच उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने सर्व शिवसेना नेते पक्षाची भूमिका वेळोवेळी मांडत असतात, असेही पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा