*सोलापूर प्रतिनिधी*
*झिहान. बागवान*
*टाइम्स 45 न्युज मराठी
समाज उद्धारक विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती प्रकाश बापूजी हौसिंग सोसायटी, लष्कर येथे उत्साहात पार पडला,
कार्यक्रमाची सुरुवात बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आला, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राज्य परिवहन महामंडळाचे सेवानिवृत्त मुख्य अधिकारी इरण्णा वन्यालोलू होते. प्रस्तावना डॉ. योगेश पल्लोलू यांनी केली तर सूत्रसंचालन व्यंकटेश चन्नेपागुल यांनी केले,
यावेळी प्रा.नरसिंह आसादे,अंजन मिसालोलू, डॉ. प्रसाद कुमार,दिनेश म्हेत्रे,नागेश म्हेत्रे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षाबद्दल माहिती सांगितली.
कार्यक्रमाचे संयोजक मल्लिकार्जुन पिलगेरी यांनी मान्यवरांचे आभार मानले.
उपस्थित मान्यवरांचे गुलाब पुष्प व पेन देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचा शेवट मुलांना खाऊ वाटप करून करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मल्लेश शावणकर, सुनील बोलेद्दूल, शंकर म्हेत्रे, शिवा म्हेत्रे, संजय काटमे आदींनी परिश्रम घेतले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा