*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
गौरवशाली समाजकार्यामुळे बागवान सोशल फाउंडेशनला 2025 आयकॉन पुरस्कार ने सन्मानित
बार्शी -गेल्या बारा वर्षापासून समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सामाजिक संस्थांना व्यक्तींना सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या युगदर्शक प्रतिष्ठान तर्फे युग दर्शक आयकॉन पुरस्कार देण्यात येते. दिनांक 26 एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता यशवंतराव चव्हाण हॉल या ठिकाणी पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रमात कार्यक्रमाचे अध्यक्ष आ. दिलीपराव सोपल, प्रमुख पाहुणे डॉक्टर शिवरत्न शेटे , प्रीती बांगर, पप्पा कसबे,व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत
2025 चा मानाचा युग दर्शक आयकॉन पुरस्कार बार्शी शहर तालुक्यात सोलापूर जिल्ह्यात तळागाळापर्यंत कार्य करणाऱ्या बागवान सोशल फाउंडेशन या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जुबेर भाई बागवान यांना देण्यात आला. यावेळी युगदर्शक संस्थेचे अध्यक्ष नितीन भोसले, मा. वि. गटनेचे नागेश अक्कलकोटे, डॉक्टर प्रकाश बुरगुटे पत्रकार संतोष सूर्यवंशी, संजय आबा बारबोले ,बार्शी शहर पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे, नाना वाणी, अण्णा पेठकर, सुरज मुल्ला, गोणेकर व युग दर्शक चे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.
बागवान सोशल फाउंडेशन चे उपाध्यक्ष अन्वर बागवान, सचिव पत्रकार कदीर भाई बागवान, अकबर बागवान, खजिनदार मुक्ती मोहीत काश्मी,
यावेळी बागवान समाजाचे अकलूजचे मुक्तार बागवान, फरीद भाई बागवान, भैय्या माढेकर, मंगळवेढ्याचे बिलाल भाई बागवान, राष्ट्रवादी अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष नजीर भाई इनामदार, वैराग चे रईस बागवान, इरफान बागवान, करमाळा येथून शफिक भाई बागवान, रशीद भाई तांबोळी, हाजी सलीम बागवान मंगळवेढा, बाबुल भाई मुजावर, पुण्याहून रफिक बागवान, संभाजीनगर बाकी भाई बागवान, जळगाव डॉक्टर शरीफ बागवान, सातारा नासिर भाई बागवान, परभणी हबीब भाई बागवान, बीड हुन रशीद भाई बागवान, सुनंदाताई चव्हाण, प्रमिला ताई झोंबाडे , मनगिरे ताई , राजश्री गवळी ताई ,इब्राहिम काजी, बादशाह बागवान, पत्रकार आजम बागवान, पत्रकार संगीता ताई पवार, सोलापूर अकबर बागवान, युसुफ जमादार, फिल्म कलाकार दीपक ओहाळ व जुबेर भाई बागवान यांचे सर्व कुटुब या कार्यक्रमात सहभागी झाले होते. कार्यक्रमानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नितीन भोसले यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी बंधू भगिनी नी गर्दी केली होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अपर्णा दळवी यांनी सुरेख केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा