*अकलूज --प्रतिनिधी*
*केदार---- लोहकरे*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
होमिओपॅथीचे जनक डॉ. समयुअल हनेमान यांच्या २७० व्या जयंती निमित्त होमिओपॅथिक डॉक्टरांसाठी माळशिरस तालुक्यातील नवचारी-अकलूज येथील निगा होमिओपॅथी हॉस्पिटल नवचारी येथे कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
या मध्ये डॉ.जानकीराम तळेले ( MD PATHOLOGY) जळगाव यांनी तसेच पुण्याहून खास उपस्थित असलेले डॉ. नितीन पोरे यांनी शुगर या आजारावर मार्गदर्शन केले तसेच डॉ निखिल जामदार यांनी EPILEPSY (फीट) हा आजार आणी होमिओपॅथीवर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली. सूत्रसंचालन डॉ.अमृता श्रीगणेश देशमुख यांनी केले स्वागत गीत सौ गायत्री जामदार यांनी केले
आभार प्रदर्शन होमिओपॅथीचे तालुका अध्यक्ष डॉ.अभिजीत राजेभोसले यांनी केले तसेच यापुढील काळात अशा प्रकारच्या कार्यशाळा नेहमी घेण्यात येतील असे आश्वासन डॉ अभिजीत राजेभोसले यांनी दिले,तसेच लवकरच रुग्णांना मोफत होमिओपॅथिक आरोग्य शिबीर घेण्यात येतील असे ग्वाही पण दिली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा