*विशेष---प्रतिनिधी*
*राज(कासिम) -मुलाणी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
भाजपाचे विधान परिषद आमदार रणजितसिंह मोहिते - पाटील व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार धैर्यशील मोहिते - पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ग्रामपंचायत सदाशिवनगर, पुरदांवडे, येळीव,जाधववाडी, व ताम शिदवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन शिवामृत भवन सदाशिवनगर येथे करण्यात आले रक्तदान शिबीराचे उद्घाटन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते -पाटील व माळशिरसचे लोकप्रिय आमदार उत्तमराव जानकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थिती जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख हे होते
शिबिराची सुरुवात सहकार महर्षी काकासाहेब व राजमाता अक्कासाहेब यांच्या प्रतिमा चे पूजन करून करण्यात आले आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे भारतीय जनता पार्टीचे आमदार असून त्यांचे नेते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आहेत व खासदार धैर्यशील मोहिते पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार आहेत व त्यांचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब आहेत दोन्ही नेत्यांचे पक्ष व नेते वेग वेगळे असून माळशिरस तालुक्यातील जनता सहकार महर्षी शंकरराव मोहिते -पाटील यांचे पासून ते माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील व सध्याचे विद्यमान आमदार रणजितसिंह मोहिते - पाटील व खासदार धैर्यशील मोहिते - पाटील यांच्यावर मनापासून भरभरून प्रेम करीत आली आहे .मोहिते पाटील कुटुंबावर या माळशिरस तालुक्यातील लोकांचे प्रेम ,श्रद्धा , व निष्ठा आहे. हा विश्वास विजयसिंह मोहिते - पाटील ,रणजितसिंह मोहिते - पाटील , व धैर्यशिल मोहिते - पाटील , व मोहिते - पाटील कुटुंब सार्थ ठरवण्याचा अतोनात प्रयत्न करीत आहेत
आमदार रणजितसिंह मोहिते - पाटील व खासदार धैर्यशिल मोहिते -पाटील यांनी आपला वाढदिवस हार तुरे फेटे व डिजिटल पोस्टर न लावता सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्याचे आव्हान दोन्ही नेत्यांनी केले त्यामध्ये रक्तदान शिबीर ,वृक्षारोपण ,विद्यार्थ्यांना शालेय साहितत्याचे वाटप करून करावे असे आवाहन केले होते त्यांच्या आव्हानास प्रतिसाद देवुन मोहिते - पाटील प्रेमी सदाशिवनगर , पुरदांवडे ,जाधववाडी , येळीव व तामशिदवाडी येथील लोकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून रक्तदान केले आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या
यावेळी विविध संस्थांचे पदाधिकारी , माजी जिल्हा परिषद सदस्य ,पंचायत समितीचे सदस्य, विकास सोसायटीचे चेअरमन ,आजी माजी सरपंच व सदस्य ,नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील ब्लड सेंटर अकलुज यांनी रक्त संकलन केले रक्तदान शिबिरासाठी डॉ संतोष खडतरे डॉ.विजयसिंह भगत डॉ. ज्ञानदेव ढोबळे . डॉ. अजित गांधी यांचे मोलाचे सहकारी लाभले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा