Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, २६ मे, २०२५

"*टाइम्स 45 न्यूज मराठी" च्या बातमीचा इफेक्ट चांदापुरी येथील वाकलेला विद्युत पोल महावितरण केला सरळ!*

 


*माळशिरस तालुका --प्रतिनिधी*

   *रशिदभाई शेख*

  *टाइम्स 45 न्यूज मराठी

टाईम्स 45 news मराठी इफेक्ट माळशिरस तालुक्यातील चांदापुरी परिसरातील वाकलेले विद्युत पोल त्वरित सरळ करून द्यावेत, अशी मागणी करण्यात आली होती.चांदापुरी येथील हद्दीत असणाऱ्या जुना नष्टे डीपी वरून याकुब दादाखान पठाण यांच्या गट क्रमांक 260- 2अ/1 शेतामधुन आलेले विद्युत पोल पुर्णपणे वाकले असल्याने सदरचे विद्युत पोल कोसळल्यास शेतकय्राचे मोठ्या प्रमाणात नुकसान होवुन जनावरे,व माणसांची जिवीतहानी होण्याची दाट शक्यता होती,तरी अशा प्रकारची दुर्गटना होवु नये यासाठी टाइम्स 45 न्यूज मराठी ने 19 एप्रिल 2025 च्या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध केली होती. तरी सदरच्या बातमीची दखल घेऊन अकलुज येथील महावितरण चे कार्यकारी अभियंता यांनी त्वरीत वाकलेले विद्युत पोल सरळ करून द्यावेत यासाठी पिलीवचे एम एस इ बी चे अधिकारी थोरात साहेब यांना आदेश दिले.याचीच दखल घेऊन महावितरण चे अधिकारी, कर्मचारी यांनी वाकलेले पोल सरळ करून दिले.वाकलेले विद्युत पोल सरळ करून मिळण्यासाठी आमचे माळशिरस तालुका प्रतिनीधी रशीद भाई शेख, यांनी अकलुजचे महावितरणचे कार्यकारी अभियंता यांना दूरध्वनीवरून सुध्दा संपर्क केला होता. पोल सरळ करून मिळाल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. तसेच शेतकरी बांधवांनी महावितरण चे व*"*times 45 news मराठी चे*" "आभार मानले आहेत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा