उपसंपादक - नूरजहाँ शेख
टाइम्स 45 न्युज मराठी
माळशिरस तालुक्यातील गणेशगाव व इंदापूर व माळशिरस तालुक्यालाव गिरवी गणेशगाव या दोन गावांना जोडणारा
बंधारा मागच्या
पाच वर्षा पूर्वी तुटून, वाहून गेला होता तेव्हापासून दोन्ही गावांचा संपर्क पूर्णपणे खंडित झाला आहे. मे महिन्यात झालेल्या अनपेक्षित आणि जोरदार पावसामुळे नदीचे पाणी अचानक वाढले, परंतु बंधाऱ्याचे दरवाजे वेळेवर उघडले गेले नाहीत, ज्यामुळे पाण्याचा प्रवाह अडवला गेला आणि त्याचा दाब वाढून नदीने मार्ग बदलला नदी किनारच्या शेतकऱ्यांची शेतात डोलणारी पिके व शेत रौद्र रूप धारण केलेल्या नदीने गिळंकृत केले आहे.शेतकऱ्यांची मेहनत तर गेलीच परंतु गुंतवणूकही वाहून गेली आहे.
ग्रामस्थांना अनेक अडचणींशी सामना करावा लागत आहे. विद्यार्थ्यांना शाळा-महाविद्यालयात जाणे अशक्य झाले आहे, रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाहीत, तर गिर्वी गावातील नागरिक बाजारहाट व दैनंदिन गरजांसाठी माळशिरस तालुक्यातील अकलूज वर अवलंबून आहेत , हा बंधारा तुटल्यामुळे ग्रामस्थांचे व शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. प्रशासनाकडून बंधारा दुरुस्तीचे काम मागील पाच वर्षा पासून पासून रखडलेले आहे. त्यामुळे केळी ,उसासारखी नगदी पिके उन्हाळ्यात करपून गेली,बंधारा आहे परंतु पाणी अडवता येत नाही ,पाऊसपाणी भरपूर आहे परंतु त्याचा उपयोग शेतीसाठी करता येत नाही , नदी उषाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती शेतकऱ्यांची झाली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. प्रशासनाने तात्काळ बंधारा पूर्ववत करून द्यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली असून पाटबंधारे विभागाने त्वरीत पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा