*इक्बाल बाबासाहेब मुल्ला* *(पत्रकार)-सांगली*
*मो:--8983 587 160
सांगलीतील सुप्रसिद्ध उद्योजक सामाजिक कार्यकर्ते माझे मित्र - हितचिंतक - बंधू "जब्बार बारसकर" यांचे सुपूत्र, अल्पावधीत "अपार कष्टाने" एक युवा उद्योजक. म्हणून "बिरुदावली" प्राप्त करणारे माझे पुतणे - माझे मानसपुत्र. अलबतीन यांचा विवाह नुकताच मोठ्या थाटामाटात" संपन्न झाला.
प्रेम - विश्वास आणी आयुष्यभर "साथ" देणारे अतूट नाते म्हणजेच "विवाह" होय. दोन आत्म्याचे मिलन, एक अतूट बंधन म्हणजेच हे विवाहबंधन होय. आज अलबतीन विवाहबंधनाच्या मधुर गाठीत "एकरूप" होताना मनस्वी "आनंद" आणि "समाधान" मिळाले. नवदांपत्याच्या उज्वल *lभविष्यासाठी माझ्या शुभेच्छा आहेत.
अलबतीन जब्बारभाई यांचा सुपुत्र असला तरी माझ्या पोटच्या मुलाप्रमाणे अलबतीनवर मी प्रेम केले आहे. माझ्या मुलाचे नावं सुहेब हे असताना देखील त्याला पाहून मी घरात बतीन ..बतीन..असे एक - दोन वेळा उच्चारतो. यावरून माझ्या "आरसपाणी" प्रेमाची "अनुभूती" यावी.
विशेषतः माझ्या व्यवसायाचे - फर्मचे नावदेखील "अलबतीन" हेच मी दिले आहे.
असो, अलबतीनच्या विवाहात एक संस्मर्णिय आणि कधी ही न पाहिलेल्या तब्बल 6 फुटी* भव्य असा पुष्पगुच्छ. देण्याचा मी "संकल्प" केला. 5 फूट रुंद आणि *6 फूट उंच* असणारा हा पुष्पगुच्छ दुचाकी / रिक्षा /चारचाकी कार मधून आणणे शक्य नव्हते, म्हणून एका मालवाहतुकीच्या*. टेम्पोतुन तो विवाहमंडपात आणण्यात आला. विवाहानंतर मी अलबतीन ला तो "पुष्पगुच्छ" सप्रेम भेट. दिला.
सदर विवाहप्रसंगी सांगली जिल्हा नव्हे तर महाराष्ट्रातून "बारसकर परिवार" वर प्रेम करणारे अनेक राजकीय - शैक्षणिक आणि सामाजिक. क्षेत्रातील उद्योजक /प्रतिष्ठित मंडळींनी "उपस्थिती" लावत कार्यक्रमाची "शोभा" वाढवली.
खासदार --विशाल पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या व्हाईस चेयरमन जयश्री पाटील, भाजपा किसान मोर्चाचे उपाध्यक्ष पै. पृथ्वीराज पवार, कोल्हापुरातील माजी महापौर हसीना फरास सिने अभिनेता वसीम फरास, अलबतीन आणि त्याच्या पत्नीचा लाडका असणारा माझा मुलगा सुहेब तसेच अनेक नगरसेवक, विविध संघटनांचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
त्याशिवाय अलबतीन, अरसलान, आणि अजेन यांच्यावर "प्रेम"करणारे त्यांचे असंख्य मित्र परिवार* विवाह समारंभाला आवर्जून उपस्थित होते.
या नवदांपत्याच्या नवीन नात्याला बहर येऊ दे, या दोघांच्या जीवनात सुख - समाधान लाभू दे, या दोघांच्या इच्छा - आकांक्षांना नवे पंख नवी "ऊर्जा" मिळू दे.
"परमेश्वर" यांची सर्व स्वप्ने पूर्ण करू दे, माझ्या वाट्याचीही सर्व *सुखे* "अलबतीन" ला मिळूदे ही अल्लाहकडे* सदिच्छा व्यक्त करतो, प्रार्थना करतो. पुनःश् दोघांना हार्दिक शुभेच्छा - शादी मुबारक
*इकबाल बाबासाहेब मुल्ला*
( *पत्रकार* )
संपादक - सांगली वेध
संपादक - वेध मीडिया न्यूज,सांगली
*मोबाईल - 8983587160*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा