*विशेष---प्रतिनिधी*
*राज(कासिम) -मुलाणी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
रविवार दि ४ मे २०२५ रोजी इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आले असता नऊदारे (लासुर्णे) येथे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस चे सरचिटणीस क्षितीजदादा वनसाळे यांच्या विनंती ला मान देऊन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील वेळात वेळ काढून थांबले. त्याचप्रमाणे काही विकास कामे असतील तर ती कामे मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. यावेळी आस्थेने सर्वांची त्यांनी विचारपूस केली.
या सत्काराच्या वेळी "मी आंबेडकरवादी" सामाजिक संघटनेचे अध्यक्ष सुरजभैय्या वनसाळे, लासुर्णे गावचे ग्रामपंचायत सदस्य संतोष (पिपा) लोंढे, जयपाल तोरणे, डॉ.संजीव लोंढे, पंकज तोरणे, राजेश बनसोडे, प्रथमेश खरात, मसु तोरणे उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा