*इकबाल बाबासाहेब मुल्ला-- (पत्रकार)*
*सांगली*
*मो:-8983 587 160
पहलगाम. हल्याचा बदला अखेर भारताने घेतला असून ऑपरेशन सिंदूर अंतर्गत अतिरेकी तळांवर केलेल्या हल्ल्यात 9 ठिकाणांना लक्ष्य करत,आतिरेकी आणि त्यांची उगमस्थाने नष्ट करत पाकिस्तानचे "कंबरडे" मोडले आहे.
सोफिया कुरेशी आणि व्योमीका सिंह या धाडसी महिला कर्नलनी केलेली कारवाई अभिमानास्पद आणि संपूर्ण देशाची छाती गर्वाने फुलण्यास कारणीभूत करणारी ठरली आहे.
मुस्लिम - मुस्लिम या नावाने सदैव "बोंब" मारणाऱ्या प्रखर जातीयवादी विचाराला आणि सर्वधर्मसमभाव या पवित्र शब्दाला कस्पटासमान लेखनाऱ्या प्रवृत्तीला सोफिया कुरेशी या भारतीय मुस्लिम कर्नलच्या धाडशी मोहिमेमुळे सडेतोड "चपराक" बसली आहे.
कोरोना. काळात समस्त मुस्लिमांनी हिंदू बांधवांना सर्वोतोपरी मदत केली, परिवारातील सदस्य त्या कोरोना झालेल्या नातेवाइकाजवळ जाण्यास "घाबरत" असताना , विविध मुस्लिम ट्रस्ट. च्या मुस्लिम कार्यकर्त्यांनी शेकडो हिंदू बांधवांच्या मृत शरीरास मुखाग्न दिला.
महापुरात "जातपात" न पाहता हजारो जेवणाची पाकिटे हिंदू बांधवांना देण्यात आली, आणि सर्वोतोपरी मदत करण्यात आली. तात्पर्य, जातीपातीच्या घृणास्पद भिंती कधीच उध्वस्त झालेल्या असताना, केवळ प्रसिद्धीसाठी मुस्लिमविरोधी वक्तव्य करून, मुस्लिमांविरोधात संभ्रम निर्माण करून काय साध्य होणार आहे ??
आज जाणीवपूर्वक हिंदू - मुस्लिम बांधवांच्या मनात जातीय विषवल्ली पसरवण्याचे षडयंत्र रचले जातं आहे,त्या कृतीला पाकिस्तान वर बॉम्बचा वर्षाव करत,पाकिस्तान ला "चारीमुंड्या चित" करणाऱ्या व्योमीका सिंह आणि सोफिया कुरेशी या महिला कर्नलमुळे "जातीयवाद्यांच्या" डोळ्यात झणझणीत अंजन घातले आहे.
लष्कर आणि भारताचे पंतप्रधान यांचे ही विशेष अभिनंदन ! कारण पंतप्रधान-- नरेंद्र मोदी यांनी लष्कराला सर्वाधिकार देत यशस्वीपणे पाकिस्तानचे "पानिपत" करून त्यांना "गुडघे" टेकावयास भाग पाडले आहे.
भारतात वारंवार अतिरेकी हल्ले करणाऱ्या पाकिस्तानवर भारताने भविष्यात अशीच धडाकेबाज कारवाई करत,पाकिस्तानला "अद्दल" घडवत, पाकिस्तान उध्वस्त करावा.
जय हिंद ,जय भारत ..!
इकबाल बाबासाहेब मुल्ला
( *पत्रकार*)
संपादक - सांगली वेध
संपादक - वेध मीडिया न्यूज,सांगली.
*मोबाईल - 8983587160*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा