Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, ८ मे, २०२५

*पुण्यात कॉफी शॉप मध्ये अश्लिल चाळे* *4 कॉफी शॉप वर गुन्हा दाखल-- चौघांना अटक*

 


*विशेष---प्रतिनिधी*

  *राज(कासिम) -मुलाणी* 

 *टाइम्स 45 न्यूज मराठी

पुणे : महाविद्यालयाजवळ कॉफी शॉप नावाचा बोर्ड लावण्यात आला होता. हडपसर पोलिसांनी तेथे छापा टाकल्यावर आतमध्ये कॉफी बनविण्यासाठी लागणारे कॉफी पावडर, साखर व इतर साहित्य आढळून आले नाही. तेथे आढळून आल्या ते प्लायवूड लावून तयार करण्यात आलेली कंपार्टमेंट़. कॉफी शॉपच्या नावाखाली तरुण तरुणींना अश्लिल चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करुन देणार्‍या या चार कॉफी शॉपचालकावर पोलिसांनी कारवाई करून त्यांना अटक केली आहे. या चार कॉफी शॉपमध्ये तब्बल २९ कंपार्टमेंट तयार करण्यात आल्या होत्या.


याबाबत पोलीस अंमलदार स्वप्नील रामदास भुजबळ यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी लाईव्ह केक शॉपचे वेदांत रणजित मदने (वय ३०), डिलाईट कॅफेचा चालक अजय उदयभान गुप्ता (वय १९, रा. गजानन हॉस्टेल, महादेवनगर), कॅफे कॉफी पिक्सचा चालक जीवन सावंत आणि कॅप्टन कॅफेचा मालक अजय अशोक जाधव (वय २९, रा. महादेवनगर) यांना अटक करण्यात आली आहे.


कॉफी शॉपचा बोर्ड लावून रुममध्ये प्लायवूडचे कंपार्टमेंट तयार करुन पडदे लावून अंधार करुन शाळा व कॉलेजमधील मुला मुलींना अश्लिल चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करुन देत होते. त्यांना पोलिसांनी १७ मार्च २०२५ रोजी नोटीस देऊन अशा प्रकारे कृत्य न करण्यास बजावले होते. तरीही त्यांनी हे प्लायवूडचे कंपार्टमेंट काढून टाकले नव्हते.


मांजरी रोडवरील महादेवनगर मधील अण्णासाहेब मगर कॉलेज येथे अथर्व अवेन्यू या इमारतीत कॉफी शॉप चालक तरुण तरुणींना जागा उपलब्ध करुन देत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर या सर्व कॅफेवर एकाचवेळी छापा टाकण्यात आला. कॉफी शॉपचा बोर्ड लावला असला तरी तेथे आतमध्ये कॉफी बनविण्यासाठी लागणारे साहित्य कॉफी पावडर, साखर व इतर साधने दिसून आली नाही.


लाईव्ह केक शॉपमध्ये माळा तयार करुन त्यावर एकूण १२ छोटे कंपार्टमेंट तयार केले होते. डिलाईट कॅफेमध्ये १३ छोटे कंपार्टमेंट तयार केले होते़ कॅफे कॉफी पिक्स येथे २ कंपार्टमेंट, कॅप्टन कॅफेमध्ये २ कंपार्टमेंट तयार केले होते. त्यामध्ये कॉलेजचे तरुण मुले मुली अश्लिल चाळे करत असताना मिळून आले. या सर्वांना नाव पत्ता विचारुन त्याबाबत खात्री त्यांच्या ओळखपत्राची पाहणी करुन त्यांना समज देऊन सोडून देण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा