*विशेष---प्रतिनिधी*
*राज(कासिम) -मुलाणी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
बोरगाव ता. माळशिरस जि. सोलापूर येथील मोहनराव पाटील विद्यालय चे मुख्याध्यापक नामदेवराव काळे सर यांच्या सेवापुर्ती नंतर सेवानिवृत्ती निमित्त सहकार महर्षी कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील(बाळदादा) यांच्या शुभहस्ते व शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा स्वरूपाराणी मोहिते पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सपत्नीक सत्कार समारंभ संपन्न झाला.
याप्रसंगी बोलताना जयसिंह मोहिते पाटील यांनी काळे सरांचा शिक्षक म्हणून असताना केलेले कार्याचा गौरव करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या वेळी प्रशालेचे सभापती प्रकाशराव पाटील,निकिता काळे यांनी सरांना सेवापुर्ती निमित्त शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रम ला माजी सभापती रावसाहेब पराडे पाटील,इंदापूर तालुका खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन गजानन जगताप, किसनराव काळे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमचे प्रास्ताविक वाघमारे सर तर आभार बाळासाहेब पराडे पाटील यांनी मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा