*अकलूज ---प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज अकलूज
जुन्या पिढीतील आंबेडकर चळवळीतील एक निष्ठावंत कार्यकर्ता भागवत (आप्पा) केरू गायकवाड यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी ते ८० वर्षाचे होते.संपुर्ण सोलापूर जिल्ह्यात त्यांची निळी टोपी प्रसिद्ध होती.त्यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) पक्षाचे काम केले होते.माळशिरस तालुका, जिल्हा ते पश्चिम महाराष्ट्र कार्यकारिणीवर एक पदाधिकारी म्हणून त्यांनी आयुष्यभर पक्षाचे काम केले आहे.आरपीआय पक्षाचे नेते,माजी राज्यपाल तथा विधान परिषदेचे माजी सभापती दिवंगत रा.सु.गवई यांचेशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते.महाराष्ट्र शासनाच्या वतीने त्यांना दलित मित्र पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते.त्यांच्या पश्चात एक मुलगा,तीन मुली, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा