*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापूर येथे VIP व पेड दर्शन पासचे पैसे मंदिराच्या खात्यावर न पड़ता महोदय, खाजगी कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा होत असले बाबत या मागणीसाठी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष गणेश पाटील यांनी महाराष्ट्राचेमुख्यमंत्री,
जिल्हाधिकरी,धर्मादाय आयुक्त,तहसीलदार तथा व्यवस्थापक मंदिर संस्थान तुळजापूर यांना दिनांक 08 मे रोजी सदर निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे .सदर निवेदनामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की,श्री तुळजाभानी मंदिर संस्थान, तुळजापूर येथे महाराष्ट्र तसेच देशातून दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. यापैकी बरेच भाविक हे वेळेच्या अभावामुळे VIP तसेच पेड पास काढुन लवकर दर्शन घेत असतात. शासन हे डिजीटल पेमेंट मोडचा वापर करा असे वारंवार सांगत असते. त्यामुळे भाविक सदर पास काढत असताना पासचे पैसे हे ऑनलाईन पध्दतीने भरत असताना परंतु मंदिर कर्मचारी हे रोख पैसे देण्यास सांगत असतात तसेच मंदिराच्या खात्याचा क्यू आर कोडव्दारे पैसे मंदिर खात्यात जमा होणे अपेक्षीत असते. परंतु मंदिरामध्ये लावलेले मंदिराच्या खात्यांचे अनेक क्युआर कोड हे चालत नाहीत. तेंव्हा कर्मचारी हे स्वतःच्या मोबाईलवरील क्यु.आर कोड व्दारे स्वतःच्या खात्यामध्ये पैसे भरण्यास भाविकांना सांगतात व आम्ही हे पैसे मंदिर खात्यावर जमा करतो असे सांगतात. परंतु खरोखरच हे पैसे मंदिराला मिळतात का त्यावरही अशा पध्दतीने दरोडा पडतो हे मोठे प्रश्नचिन्हच आहे. तेंव्हा मा.महोदयांनी मागील सहा महिन्यापासुनची वरील गोष्टींची सखोल चौकशी करावी व दोषी व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच जेथुन VIP व पेडपासचे भाविक सोडले जातात तेथील सी.सी.टी.व्ही. तसेच VIP रजिस्टरच्या नोंदी जुळतात काय याची वरीष्ठ अधिकाऱ्यांकडुन आमच्या समक्ष तपासणी करण्यात यावी. तसेच PRO, पास काढणारे कर्मचारी यांचे बँक स्टेटमेंट चेक करण्यात यावे व गेट वरून VIP साडणारे कर्मचारी यांचे CDR इत्यादी सर्व गोष्टीची वरीष्ठ अधिकाऱ्यांमार्फत तपासणी करण्यात यावी व त्यात कांही अधिकारी व कर्मचारी दोषी आढळल्यास त्यांच्यावर तात्काळ निलंबनाची कार्यवाही करण्यात यावी असेही निवेदनात नमुद करण्यात आले आहे .या निवेदनावर जिल्हाध्यक्ष गणेश पाटील यांची स्वाक्षरी आहे .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा