*सोलापूर ---प्रतिनिधी*
*आंबिद. बागवान*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
आज गृहराज्यमंत्री श्री. योगेश कदम सोलापूर दौऱ्यावर आले असताना कासेगाव ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेतली. दीड वर्षांपूर्वी कासेगाव येथील महिला ग्रामसभेमध्ये गावात संपूर्ण अवैध दारूबंदीचा ठराव संमत करण्यात आला होता. या ठरावासंदर्भात कार्यवाही करण्यासाठी पोलीस प्रशासन व उत्पादन शुल्क विभागाला वारंवार पाठपुरावा केला होता. तरीही कासेगाव मध्ये अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे. विषारी रसायनक्त दारूमुळे अनेक लोकांची जीव जात आहेत. तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जाऊन बरबाद होत आहे. घरातील कर्त्या पुरुषाच्या व्यसनाधीनतेमुळे घरातील महिलांना-मुलांना प्रचंड आर्थिक, मानसिक, सामाजिक तणावाचा सामना करावा लागत आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी माननीय गृह राज्यमंत्र्यांनी वैयक्तिक लक्ष घालून कासेगाव मध्ये लवकरात लवकर संपूर्ण दारूबंदी करावी. व त्यासाठी पोलीस प्रशासनास योग्य त्या सूचना द्याव्यात, अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली. उपस्थित गावातील महिलांनी सुद्धा माननीय मंत्री महोदयांसमोर त्यांच्या व्यथा मांडल्या. सदर निवेदनाला ताबडतोब प्रतिसाद देत माननीय मंत्री महोदयांनी त्वरित जिल्हा पोलीस अधीक्षकांना मोबाईलवर संपर्क करून सदर विषयाकडे गांभीर्याने लक्ष देण्यास सांगितले. व अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर तडीपारीची कारवाई करण्यास सांगितले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे हे सुद्धा यावेळी उपस्थित होते. त्यांनी देखील सदर प्रकरणात लक्ष घालण्याचे आश्वासन दिले. या भेटीसाठी शिवसेना जिल्हाप्रमुख मनीष (आण्णा) काळजे यांचे विशेष सहकार्य लाभले.
यावेळी कासेगावचे लोकनियुक्त सरपंच यशपाल श्रीकांत वाडकर, राजाराम पाटोळे,. ताजुद्दीन शेख, तनुजा मुळे, प्रकाश हेडे, संभाजी चौगुले, . जालिंदर गायकवाड, भरत जाधव,. अनिता हेडे, . सोनाली वाडकर, . जाधव, . तांबटकरी आदी उपस्थित होते.
यानंतर उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक सौ. भाग्यश्री जाधव - खेतमाळीस यांनाही निवेदन देऊन अवैध दारू विक्रीवर कारवाई करण्याची मागणी केली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा