*अकलूज --प्रतिनिधी*
*केदार---- लोहकरे*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
उत्कृष्ट नृत्य कलाकार,नाट्य कलाकार तेव्हाच घडतो जेव्हा त्याला योग्य मार्गदर्शन मिळते. अकलूज शाखेने लहान मुलांसाठी योग्य प्रशिक्षण शिबीर घेतले जाते ही कौतुकास्पद बाब असल्याचे मत सिनेअभिनेते अजय तपकिरे यांनी व्यक्त केले.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई शाखा अकलूजच्या वतीने ७ दिवसीय नृत्य,नाट्य,अभिनय कार्यशाळेचे आयोजन केले होते.या कार्यशाळेचा समारोप कु.इशिता मोहिते-पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी सिनेअभिनेते अजय तपकिरे, प्रमुख कार्यवाह डॉ.विश्वनाथ आवड,शिवरत्न शिक्षण संस्थेचे सचिव धर्मराज दगडे,संचालक श्रीकांत राऊत,नितीन बनकर, सहकार्यवाह सुनिल कांबळे, लालासाहेब मुजावर, प्रशिक्षक मनोज वर्दम,श्रीकांत जाधव, आशिकी चिंतामणी यांच्यासह नाट्य परिषदेचे सदस्य व बालकलाकार उपस्थित होते.
पुढे तपकिरे म्हणाले, परीक्षांचा हंगाम संपला की, विद्यार्थ्यांच्या इतर कलागुणांना वाव देण्यासाठी पालकांचे शोधकार्य सुरू होते.त्यात अनेक कलांची शिबिरे याच काळात भरतात.यात अकलूज शाखेने घेतलेल्या या शिबीराकडे अकलूजसह परिसरातील सर्वांचाच कल राहिला आहे.या शिबीराचा लाभ भविष्यकाळात निश्चीतच होईल असेही ते म्हणाले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन नागनाथ साळवे यांनी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा