Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, ३० मे, २०२५

*मुलगीच हवी वंशाला!* *नाव तिचे गगनाला!!* *श्रेया गणेश उबाळे हिचे उज्वल यश*


 

*विशेष---प्रतिनिधी*

  *राज(कासिम) -मुलाणी* 

 *टाइम्स 45 न्यूज मराठी

बावडा. येथील श्री गणेश नामदेव उबाळे या अकलूज येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील पेट्रोल पंपाकडे अटेंडंट म्हणून गेली सतरा वर्षे काम करणाऱ्या व शून्यातून मार्गक्रमण करणाऱ्या या कुटुंबातील मुलगी कु. श्रेया गणेश उबाळे ही जिजामाता प्रशाला सराटी तील विद्यार्थिनी असून सेमी शैक्षणिक प्रकारामध्ये एस एस सी बोर्डाच्या २०२४/२४ या शैक्षणिक वर्षात शाळेमधे प्रथम क्रमांक मिळवला असून तिला ९४.४०% मार्कस मिळाले आहेत आपली मुलगी ही प्रामुख्याने चांगल्या मार्गाने पासा झाली पाहिजे असा आग्रह त्या मुलीचे वडील श्री गणेश उबाळे यांनी धरला होता बावडा येथील तत्कालीन शिवसेना गटप्रमुख कै. नामदेव ग. उबाळे यांची श्रेया ही नात आहेया कुटुंबाला उत्पन्नाचे दुसरे काहीही साधन नाही फक्त मजुरी आणि मजुरी . या उत्पन्नावर ईर्षेला पेटुन अथक परिश्रमानंतर कु. श्रेयाने यश प्राप्त केले मुळातच घरामध्ये स्वतःसह३ बहिणी व आई-वडील असे पाच जणांचे कुटुंब आहे सदर मुलीने मिळवलेले यश हे सर्वतोपरी कौतुकास्पद आहे जिजामाता प्रशाला चे सर्वे सर्व मा. आप्पासाहेब जगदाळे ,प्रशालेतील सर्व संचालक, व शिक्षक वर्गाने श्रेया उबाळे हीचे अभिनंदन केले आहे या निकालाने शाळेचा दर्जा उंचावल्याची चर्चा सर्व दूर आहे कु.श्रेया या यशामुळे मित्र-मैत्रिणी नातलग व परिसरातील सर्वांचा ती कौतुकाचा विषय ठरली आहे आपल्या प्रमाणेच आपल्या दोन बहिणींनी असे यश संपादन करावे हीच अपेक्षा तिने ठेवली आहे मात्र गरीब कुटुंबात जन्माला येऊनही अशाही प्रकारे दुसरा कसलाही शैक्षणिक आधार न घेता हे मिळवलेले यश, घेतलेली उंच भरारी पाहता तिच्याकडून यापुढे बऱ्याच अपेक्षा आहेत असे तिचे वडील श्री गणेश उबाळे यांनी बोलून दाखवले.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा