*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ येथील २४ वर्षीय युवक जुबेर हुसेन मुलानी याचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने सोलापूर येथील खाजगी रुग्णालयात शनिवार १० मे रोजी सायंकाळी निधन झाले आहे.
कोरोना काळात वडिलांचे निधन झाले असून वडिलांच्या निधनानंतर संपूर्ण परिवाराची जिम्मेदारी त्याच्यावर होती वडिलांच्या निधनानंतर दोन नंबर बहिणीचे लग्न त्याने स्वतःच्या जिम्मेदारीवर पार पाडले असून दोन विवाहित बहिणी पश्चात आणखी दोन बहिणीचे लग्न बाकी आहे जेमतेम परस्थितीवर मात करत संघर्ष करत लढणाऱ्या य युवकाच्या अचानक निधनाने
संपूर्ण घरावर फार मोठा आघात झाला आहे वडिलांनी जोपासलेला ट्रक गाडी व्यवसाय मोठ्या अभिमानाने व हिमतीने तो पुढे वाढवत होता तो स्वतः ट्रक छोटा हत्ती, बोलेरो गाड्या विना चालक लावता स्वतः चालवत होता प्रचंड जिद्द, चिकाटी, परिश्रमाच्या जोरावर अतिशय लहान वयात घराची संपूर्ण जबादारी त्याच्यावर होती त्याच्या या अचानक जाण्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून त्याच्यावर रविवार ११मे रोजी हजारो नागरिकांच्या उपसथितीत शोकाकुल वातावरणात मंगरुळ येथील कब्रस्थान येथे अंत्यसंस्कार करण्यात आले त्याच्या पश्चात आई, आजी, चार बहिणी असं मोठा परिवार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा