Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, १३ मे, २०२५

*शासकीय व निमशासकीय कार्यालयात छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी न करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करा--- 'संभाजी ब्रिगेड''ची मागणी*


 

*सोलापूर ---प्रतिनिधी*

*आंबिद. बागवान*

  *टाइम्स 45 न्यूज मराठी

शासकीय व निमशासकीय कार्यालयात छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी न करणाऱ्या कार्यालय व संबंधित अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी अशी मागणी संभाजी ब्रिगेड च्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली. 


*सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय मुंबई यांचे दिनांक 27 डिसेंबर 2023 रोजीचे शासन परिपत्रकनुसार उद्या दिनांक 14 मे 2025 रोजी छत्रपती संभाजी महाराज जयंती आहे, बऱ्याच शासकीय व निमशासकीय कार्यालयात छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी केली जात नाही व अनेक शासकीय निमशासकीय कार्यालयात छत्रपती संभाजी महाराज यांची प्रतिमा सुधा उपलब्ध नाहीत. महापुरुषांच्या जयंती साजरी करणे हे शासन निर्णयानुसार बंधनकारक आहे तरी देखील काही कार्यालयात छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी केली जात नाही, जाणूनबुजून काही शासकीय व निमशासकीय कार्यालयाकडून शिवप्रेमी व शंभूप्रेमींचा भावनेचा अवमान केला जातो, तरी आपण तात्काळ जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांना उद्या दिनांक 14 मे 2025 रोजी छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी करण्याचे आदेश द्यावेत, जेणेकरुन शंभूप्रेमींच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत व शासन परिपत्रकाचा अवमान होणार नाही, तसेच जिल्ह्यात छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी न करणाऱ्या शासकीय व निमशासकीय कार्यालय व संबंधित अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

यावेळी संभाजी ब्रिगेड पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले महिला जिल्हाध्यक्षा मीनल दास उपशहर प्रमुख माधुरी चव्हाण जिल्हा सचिव दिलीप निंबाळकर शहर संघटक सतीश वावरे उपाध्यक्ष सिद्धाराम सावळे आदी उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा