*कार्यकारी संपादक एस. बी. तांबोळी, मोबाईल नंबर 8378081147*
-----लाखेवाडी ( तालुका, इंदापूर, जिल्हा पुणे ) येथील जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये माध्यमिक शालांत परीक्षा २०२५ इयत्ता दहावीच्या परीक्षे साठी विद्यालयातील बसलेले सर्व म्हणजे १०० विद्यार्थी उत्तीर्ण होवून विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला. शंभर टक्के निकाल लागण्याचे हे पाचवे वर्ष असून हा एक विक्रम आहे. १०० पैकी
८८ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह पास झाले असून १२ विद्यार्थी हे प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
गुणानुक्रमे निकाल पुढील प्रमाणे :
१) ज्ञानेश्वरी नाथाजी मोहिते ५०० पैकी ४९०, ९८ टक्के. व
१) मृण्मयी अतुल शिंदे. पाचशे पैकी ४९०, ९८ टक्के.
२) श्रावण अनिल जाधव. ५०० पैकी ४८८
९७.६० टक्के.
३) दुर्वा दादासाहेब जाधव. ५०० पैकी ४८३, ९६.६० टक्के.
४) प्रतीक्षा शशिकांत ढोले. ५०० पैकी ४८१,
९६.२० टक्के.
५) संस्कृती नवनाथ ढोले. ५०० पैकी ४८०,
९६ टक्के.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्रीमंत ढोले, उपाध्यक्ष सौ. चित्रलेखा ढोले, सचिव हर्षवर्धन खाडे, सहसचिव सौ. पौर्णिमा खाडे, मुख्य सल्लागार प्रदीप गुरव, विश्वस्त चि. पृथ्वीराज ढोले व चि. ऋषिकेश ढोले, विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य गणेश पवार, प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य राजेंद्र सरगर, विद्यानिकेतन कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य सम्राट खेडकर, सर्व मार्गदर्शक शिक्षक यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
अध्यक्ष श्रीमंत ढोले सर म्हणाले, गुणवत्ता केंद्रबिंदू मानून आम्ही आमचे शाळेचे विद्यार्थी ब्रँड म्हणून घडवण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होते. संस्थेचे शैक्षणिक सल्लागार प्रदीप गुरव सर, सर्व शिक्षक हे पालकांच्या सहकार्याने गुणात्मक शिक्षणावर भर देतात. त्यामुळे विद्यार्थ्यांची मेहनत यशस्वी होत असून या यशाचे श्रेय सर्वांचे आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा