*कार्यकारी संपादक एस. बी. तांबोळी, मोबाईल नंबर 8378081147
:--+++ पुणे शहर पोलिस दलात परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त म्हणून उल्लेखनीय कार्य करणारे संदीपसिंग गिल यांची पुणे जिल्हा ग्रामीणचे नुतन पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती झाली. याबाबत राज्य सरकारच्या गृह विभागाने आदेश काढला आहे.
पुणे शहरात कार्यरत असताना गिल यांनी विशेषतः गणेशोत्सवाच्या काळात शांतता व कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी कौशल्याने पार पाडली. त्यांनी गणेश मंडळांशी समन्वय, पोलिस दलाच्या नियोजनातून नागरिकांमध्ये विश्वास निर्माण केला. याशिवाय शहराच्या मध्यवर्ती भागात वाढणाऱ्या गुन्हेगारीवर अंकुश ठेवत गुन्हेगारांना लगाम घातला.
संदिपसिंह गिल यांची पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षकपदासाठी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये शिफारस झाली होती. मात्र, तत्कालीन पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांची केवळ सात महिन्यांत मुदतपूर्व बदली झाल्यामुळे त्यांनी कॅटमध्ये (केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण) याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायाधिकरणाने देशमुख यांच्या बदलीला स्थगिती दिली होती. दरम्यान, पंकज देशमुख यांची पुणे शहरात अतिरिक्त आयुक्तपदी बदली झाल्यानंतर गिल यांची पोलिस अधीक्षकपदी वर्णी लागणार हे जवळपास निश्चित होते.
दरम्यान, गिल यांच्या नियोजनबद्ध आणि प्रभावी कामकाजामुळे पुणे ग्रामीण परिसरातील गुन्हेगारीवर नियंत्रण, तांत्रिक उपाययोजना, आणि लोकाभिमुख पोलिसिंगला अधिक चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
अल्पवयीन गुन्हेगारांचे पुनर्वसन करण्यासाठी गिल यांनी विविध सामाजिक संस्थांच्या मदतीने उपक्रम हाती घेतले. अल्पवयीन गुन्हेगारांना सुधारण्याची संधी देत मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केल्याचे गिल यांनी सांगितले.
फोटो - पुणे ग्रामीणचे नुतन पोलीस अधीक्षक संदिपसिंह गिल
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा