Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, ३० मे, २०२५

*रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट युवक प्रदेश उपाध्यक्ष किरण दाजी यांचे कार्यालयात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संदर्भात महत्वपूर्ण चर्चा*

 


*श्रीपूर--बी.टी.शिवशरण

येत्या चार महिन्यांत महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागणार आहेत तेव्हा औपचारिक चर्चेच्या दरम्यान रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट माळशिरस तालुका अध्यक्ष मिलिंद सरतापे ज्येष्ठ पत्रकार बी टी शिवशरण संपादक अण्णा भोसले यांनी किरणं धाईंजे यांचेशी वार्तालाप केला तेव्हा धाईंजे यांनी सांगितले की आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व आमचे सर्वेसर्वा राजाभाऊ सरवदे जो आदेश देतील त्या आदेशांचे आम्ही तंतोतंत पालन करुन पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार कसे निवडून आणता येतील या साठी आम्ही माळशिरस तालुक्यातील आमचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते जोमाने कामाला लागू या वेळी तालुका अध्यक्ष मिलिंद सरतापे यांनी सांगितले की पक्षाचे काम प्रामाणिकपणे जे कार्यकर्ते करत आहेत तसेच पक्ष वाढीसाठी गाव तेथे आरपीआय आठवले गट शाखा आहेत तसेच ज्या कार्यकर्त्यांनी दलित पँथर चळवळी पासून योगदान दिले आहे त्यांना पक्षश्रेष्ठींनी पंचायत समिती जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपरिषद निवडणुकीत उमेदवारी देण्यात यावी यासाठी आम्ही तालुका मिटिंगमध्ये ठराव मंजूर करून आरपीआय आठवले गट प्रदेशाध्यक्ष सन्माननीय राजाभाऊ सरवदे यांचे कडे पाठवणार असल्याचे सांगितले या वेळी संपादक अण्णा भोसले यांनी प्रदेश युवक उपाध्यक्ष किरण धाईंजे यांचे माळशिरस तालुक्यातील कार्यकर्त्यांना संघटीत केले आहे त्यांचे कार्यालयात तालुक्यातील जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ पदाधिकारी सर्व कार्यकर्ते दररोज संपर्कात येतात असे सांगितले धाईंजे यांनी सांगितले की जिल्हा अध्यक्ष तालुका अध्यक्ष व सर्व पदाधिकारी व आम्ही आता पासूनच निवडणूक तयारीला लागलो आहोत आरपीआय चे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी आमचा प्रयत्न राहील यावेळी आरपीआय पक्ष धोरण भुमिका तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत यावेळी तालुकाध्यक्ष मिलिंद सरतापे यांनी काही महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली मिलिंद सरतापे यांनी सांगितले की ज्येष्ठ पत्रकार बी टी शिवशरण हे चळवळीतील घडामोडी स्थित्यंतर व कार्यकर्ते नेते यांना नेहमी प्रोत्साहन येईल अशा बातम्या लेख लिहून सडेतोड विचार लिखाण करत असतात पक्षाचे धोरण भुमिका व कार्यक्रमाच्या सर्व बातम्या देत असतात अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या या वेळी भारत पेट्रोलियम चे सेवानिवृत्त अधिकारी महादेव आठवले तुषार केंगार उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा