*अकलूज --प्रतिनिधी*
*केदार---- लोहकरे*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथील स.म.शंकरराव मोहिते-पाटील विद्यालयात झालेला स्नेहमिलन सोहळा अर्थातच माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन सोहळा अत्यंत उत्साहात तसेच खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला.खर तर बरेच माजी विद्यार्थी सोहळे हे ठराविक बॅचचे होताना आपण पाहिलेत.परंतु हा सोहळा अगदीच वेगळा होता.विखुरलेले सर्व मित्र-मैत्रिणी तब्बल २० वर्षांनंतर एकत्र आल्याने एकमेकांना पाहून सर्वजण आनंदाने भारावून गेले.
"ते म्हणतात ना ‘एक एक कडी गुंतली की त्याची साखळी तयार होते’ अगदी तशीच एक साखळी या सर्व विद्यार्थ्यांनी व्हॉट्स ॲपच्या माध्यमातून गुंतली. स्नेहभेट घडवून आणायची संधी मिळाली. या भेटीला आठवणींचा ओलावा मिळावा यासाठी ज्या शाळेत शिक्षण घेतले,त्याच शाळेतच हा स्नेहमेळावा सोहळा पार पडला.कार्यक्रमस्थळी सकाळीच सर्व नियोजना नुसार विशेष आतुरता होती ती सर्वांना त्या काळी शिकवलेल्या शिक्षकांना भेटण्याची जे आमंत्रित होते.त्यांच्या आगमनाने विद्यार्थ्यांना त्या काळात गेल्याचे जणू भास व्हायला लागले होते. सोहळ्याप्रसंगी पहिल्या सत्रात सर्व गुरुजन मंडळी तथा सहायक कर्मचाऱ्यांना सन्मानचिन्ह व रोपटे भेट देण्यात आले.यावेळी तब्बल ६० जणांनी आपल्या बालपणीच्या आठवणी त्याच वर्ग खोलीत जागवल्या.जेथून सर्वजण दुरावले होते.तिथेच पुन्हा भेटून आठवणी जाग्या केल्या.अनेकांनी तर आपल्या मुला-मुलींना सोबत आणले होते आणि ते चिमुकलेही या विद्यार्थ्यांचा सोहळा पाहून भारावून गेले.
*चौकट*
कष्टाला पर्याय नाही विद्यार्थी अनेक क्षेत्रात आपले व शाळेचे नाव कमावत आहेत.प्रत्येक जण प्रामाणिकपणे काम करीत आहे. कष्ट करण्याची तयारी अंगी असल्याने अनेकजण मोठ्या पदावर कार्यरत आहेत ही अभिमानाची बाब आहे.आज पैशाला किंमत राहिली नसली तरी दर्जेदार शिक्षणासाठी अनेकांची धडपड होत आहे. इंग्रजी पॅटर्नमुळे मराठी शाळांनाही तो बदल स्विकारावा लागत आहे.
*शहाजी दुधकर सर*
*सर्वांनी पुन्हा भेटण्याचा व्यक्त केला मानस*
खऱ्या अर्थाने एखाद्या लग्नकार्यात सगळीकडून गोतावळा जमावा असा हा मित्रपरिवार जमला होता.जसे हे जुनेच मित्र-मैत्रिणी नव्याने भेटले तसे त्यांच्यासोबत आलेल्या चिमुकल्यांनीही नवीन मित्र-मैत्रिणी जोडल्या.सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपापला परिचय करून देत मनोगत व्यक्त केले व शाळेतील किस्से,कहाण्यांना उजाळा दिला.दिवसभर गप्पागोष्टी,एकमेकांच्या हितगुजात रमल्यानंतर सोबतच भोजनाचाही आस्वाद घेण्यात आला.कार्यक्रमाचा शेवट गोड केला.शेवटी सर्वांनी पुन्हा भेटण्याचा मानसही व्यक्त करत जड मनाने एकमेकांना निरोप दिला.या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व माजी विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा