*विशेष---प्रतिनिधी*
*राज(कासिम) -मुलाणी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
माळशिरस तालुक्यातील कळंबोली पळस मंडळ बिजवडी, कदमवाडी, तिरवंडी आदी भागातील ७५ कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवले आहे कुरबावी येथे पाण्यात अडकलेल्या कुटुंबांना एनडीआरएफच्या साह्याने सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले आहे
तसेच पावसाळ्यात माळशिरस तालुक्यातील गिरझणी येथील तलाव पूर्ण क्षमतेने भरता असून सांडव्यावरून पाणी वाहत नैसर्गिक धबधबा तयार झाला आहे. हा धबधबा पाहण्यासाठी नागरिक गर्दी करीत आहेत मात्र या ठिकाणी कोणतीही सुरक्षित व्यवस्था नसल्याने पर्यटकांनी, नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावे असे आवाहन गिरझणीचे -उपसरपंच मयूर माने यांनी केले आहे हा तलाव पाटबंधारे खात्याच्या ताब्यात असून संबंधित अधिकान्यांनी धबधब्या ला लोकांसाठी सुरक्षा कठडे बांधावेत, असेही उपसरपंच मयूर माने यांनी सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा