Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, १६ मे, २०२५

तिर्थक्षेत्र नीरा नरसिंहपूर येथील श्री लक्ष्मी-नृसिंह मंदिरामध्ये श्री नृसिंह जयंती नवरात्र उत्सव भरगच्च धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न

 


*कार्यकारी संपादक एस. बी. तांबोळी, मोबाईल नंबर 8378081147

----- येथील तिर्थक्षेत्र श्री लक्ष्मी-नृसिंह मंदिरामध्ये श्री नृसिंह जयंती नवरात्र उत्सव भरगच्च धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न झाला. मंदिरामध्ये दररोज सकाळी सनई व चौघडावादन, विष्णुसहस्रनाम, पंचामृत व महानैवेद्य आरती असे धार्मिक कार्यक्रम नित्यनेमाने संपन्न झाले. 

    श्री नृसिंह जयंती नवरात्र उत्सवामध्ये भजन, सुगम भक्तिसंगीत प्रा. राजश्री ओक (पुणे), प्रवचन-ह.भ.प. बाळासाहेब देहूकर (पंढरपूर), कुचीपुडी श्रद्धा पाटील, प्रांजली खांडेकर, सृष्टी चालकापूर हैदराबाद, कीर्तन - श्रीपादबुवा लिंबेकर, श्रीराम भजन मंडळ (सोलापूर), सुगम भक्तिसंगीत शनिवार संगीत मंडळ (धाराशिव), कीर्तन चिन्मय विवेक देशपांडे (पुणे), प्रवचन माधव श्रीकांत किल्लेदार (पुणे), सुगम भक्तिसंगीत आशिष केसकर व परिवार, भजन - स्वरेषा पोरे-कुलकर्णी, अभंगवाणी- अजय देशपांडे, स्नेहा फडणीस (कोल्हापूर), प्रवचन-एकनाथ पाटील मेंढेकर, सुगम भक्तिसंगीत रसिका व सानिका कुलकर्णी (सोलापूर), कीर्तन राघवेंद्र देशपांडे, आसावरी भजन मंडळ (पंढरपूर), सुगम भक्तिसंगीत - सार्थक राजेश बावीकर (सोलापूर), प्रवचन धनंजय दत्तात्रय दुनाखे (नीरा नरसिंहपूर), सुगम भक्तिसंगीत भक्ती पागे, रावी पागे, राजेंद्र दीक्षित (पुणे), कीर्तन आनंद काकडे (नीरा नरसिंहपूर), रामकृष्ण परमहंस भजन मंडळ (फलटण), सुगम भक्तिसंगीत नादब्रह्म श्रीपूरनिर्मित भावसरगम, प्रवचन पंडित विद्यानिधी आचार्य (सोलापूर), भक्तिगीत सुकन्या व सुप्रिया दंडवते, ऋतुजा भाले, कीर्तन स्मिता प्रभाकर आजेगावकर (पुणे), कथक नृत्य अपूर्वा प्रभुणे, ओवी देशपांडे, माही कुलकर्णी, सुगम भक्तिसंगीत अनिरुद्ध धर्माधिकारी (अहिल्यानगर), प्रवचन पद्मनाभ व्यास (तेर), भावगीत/भक्तिगीत उदय भवाळकर (पुणे), कीर्तन लक्ष्मीप्रसाद पटवारी (बीड), रेणुका भजन मंडळ (सोलापूर), भावगीत/भक्तिगीत रमाकांत चाटी (नांदेड), प्रवचन डॉ. प्रशांत सुरू (पुणे), सुगम भक्तिसंगीत अनिरुद्ध जोशी, रसिका जोशी (मुंबई), कीर्तन ज्ञानेश धानोरकर, बासरीवादन - नंदकुमार डिंगरे (पंढरपूर), भक्तिसंध्या गिरीश रघुनाथ कुलकर्णी (सोलापूर), प्रवचन चातुर्मासे महाराज (पंढरपूर), भावगीत शेखर कुंभोजकर, मेधा कुंभोजकर (पुणे), कीर्तन - प्रणव जोशी (पुणे), भक्तिगीत - अजित गोसावी (पुणे), प्रवचन मोहनबुवा रामदासी यांची झाले. हार्मोनियम साथ गंगाधर देव पुणे, तबला साथ दिनकर गोसावी इंदापूर यांची लाभली.

      तसेच नृसिंह जयंतीचे कीर्तन संदीप मांडके (पुणे) यांचे झाले. तर काल्याचे कीर्तन अंकुश रणखांबे महाराज (नीरा नरसिंहपूर) यांचे झाले. नृसिंह जयंती उत्सवास उपस्थित राहण्याचे आवाहन विश्वस्त मंडळ लक्ष्मी-नृसिंह देवस्थान ट्रस्ट, समस्त ब्रह्मवृंद, सरपंच व ग्रामस्थांनी केले होते. नरसिंहपूर ग्रामस्थांच्या मनोरंजनासाठी धुमाकूळ बारामतीकर ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले होते.

चौकट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कुटुंबीयांचे कुलदैवत असणारे श्री लक्ष्मी नृसिंहाच्या दर्शनासाठी यायला भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागला. इंदापूर आगाराच्या आडमुठ्या व अडेलतट्टू पणामुळे एकमेव एसटी बस एक महिन्यापासून बंदच आहे. मुख्यमंत्री व क्रीडा मंत्री यांच्यावर कडक कारवाई करणार का? याकडे भक्तांचे लक्ष लागले आहे.

फोटो - नरसिंहपूर येथील श्री लक्ष्मी नृसिंह.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा