चि. सार्थक गिरमे
उपसंपादक - नूरजहाँ शेख
टाइम्स 45 न्युज मराठी
फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षेत दि मॉडेल विविधांगी प्रशालेचा निकाल ८३.३३ टक्के लागला असून यात प्रशालेतील विद्यार्थी चि.सार्थक सत्यजित गिरमे याने ९९.२० टक्के गुण मिळवून माळीनगर केंद्रात व प्रशालेत प्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे. तसेच चि.सिद्धेश निलेश साळुंखे याने ९५.६० टक्के गुण मिळवीत द्वितीय क्रमांक तर कु.श्रुती अनंत खाडे हिने ९१.४० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला आहे.
या यशाबद्दल दि सासवड माळी एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन चेअरमन राजेंद्र गिरमे,व्हा.चेअरमन नितीन इनामके,सेक्रेटरी अजय गिरमे, खजिनदार ज्योतीताई लांडगे, संचालक अनिल रासकर,ऍड. सचिन बधे,डॉ.अविनाश जाधव, रत्नदीप बोरावके, कल्पेश पांढरे, पृथ्वीराज भोंगळे,दिलीप इनामके,संचालिका लीनाताई गिरमे व विश्वस्त मंडळ तसेच प्रशालेचे प्राचार्य कल्लाप्पा बिराजदार,उपप्राचार्य रितेश पांढरे,पर्यवेक्षक कल्याण कापरे व शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
कु.श्रुती खाडे
चि. सिद्धेश साळुंखे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा