*विशेष---प्रतिनिधी*
*राज-मुलाणी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांसाठी अकलूज नगर परिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे यांना निवेदन देण्यात आले मागण्या पूर्ण झाल्यास मंगळवार 20 मे रोजी मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये धरणे व बोंबाबोंब आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. मागण्यांमध्ये सध्या मे महिन्यामध्ये दिवसेंदिवस उन्हाळा वाढत असून अकलूज नगरपरिषदअंतर्गत विविध विभागामध्ये उन्हामध्ये रस्त्यांवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून दुपारी 12 ते 4 वाजेपर्यंत उन्हामध्ये काम करून घेण्यात येऊ नये पंचवटी भागातील पाणीटंचाई त्वरित दूर करून या भागातील काँक्रेट रस्ते व गटारी त्वरित बांधून मिळावेत टेलिफोन टॉवरच्या बाजूला व ब्लड बँकेच्या पाठीमागे असणारे महिला स्वच्छतागृह नव्याने बांधून काटेरी झाडे व कचरा त्वरित स्वच्छ करून येथील नागरिकांना होणारा त्रास दूर करावा प्रतापसिंह चौक ते ब्लड बँक या रस्त्यावरील मुख्य गटारीचे काम त्वरित सुरू करून ती गटर त्वरित बांधून येथील स्थानिक नागरिकांना होणारा त्रास दूर करावा माझी वसुंधरा अभियानांतर्गत ठिकठिकाणी भीत्तीचित्रके काढून मोठ्या कुंड्या व झाडे लावून अकलूज परिसराचे सुंदर सुशोभीकरण करावे नगरपरिषद अंतर्गत लावण्यात आलेली काही झाडे जळाली आहेत त्या ठिकाणी नवीन झाडे लावून काही झाडे खाली पडले आहेत त्या झाडांना आधार देऊन त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करावी यासह इतर मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत यावेळी अकलूज नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी मागण्या पूर्ण करण्यात येतील असे आश्वासन दिले. यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे शहराध्यक्ष शिवाजी खडतरे तालुका सरचिटणीस दयानंद कांबळे तालुका संपर्कप्रमुख राजू बागवान सहसंपर्कप्रमुख रोहिदास तोरणे तालुका युवक संघटक विकी लोंढे माळशिरस तालुका महिला आघाडी अध्यक्षा स्वातीताई धाईंजे अकलूज शहर कार्याध्यक्ष शहाजी खडतरे अशोक कोळी अकलूज शहर उपाध्यक्ष सुवर्णा पांचाळ चांदणे मॅडम यांचेसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा