*अकलूज --प्रतिनिधी*
*केदार---- लोहकरे*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ पुणे यांच्या वतीने फेब्रुवारी, मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या १२ वी परीक्षेचा शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज चा निकाल ९५.७१ टक्के लागला.
संस्थेच्या सात शाखेतून विज्ञान,कला,वाणिज्य व व्यवसाय अभ्यासक्रम यातून एकूण १६३२ विद्यार्थी परीक्षेला बसले.यापैकी १५६२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.संस्थेत सदाशिवराव माने विद्यालयातील वाणिज्य शाखेचा चि.वरद नितीन कोतमीरे यांने ६०० पैकी ५३९ गुण व ८९.८३% मिळवीत प्रथम क्रमांक पटकावला.तर कर्मवीर बाबासाहेब पाटील विद्यालय व ज्युनिअर कॉलेज सदाशिवनगर ची कु.मनाली मनोहर भुजबळ हिने ६०० पैकी ५३७ गुण व ८९.५०% मिळवीत द्वितीय क्रमांक पटकावला.सदाशिवराव माने विद्यालयाची विज्ञान शाखेची कु.क्रांती कल्याण पांढरे हिने ६०० पैकी ५३४ गुण व ८९ टक्के मिळवीत तृतीय क्रमांक पटकावला.
संस्थेच्या सदाशिवराव माने विद्यालय अकलूज येथून विज्ञान,कला,वाणिज्य व व्यवसाय अभ्यासक्रम या शाखेतून ५८६ विद्यार्थी परीक्षेला बसले यापैकी ५७६ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन शाखेचा निकाल ९८.२९% लागला. यशवंतनगरच्या महर्षी शंकरराव मोहिते प्रशालेतून विज्ञान,कला, व्यवसाय अभ्यासक्रमातून २४१ विद्यार्थी पैकी २३२ उत्तीर्ण होऊन निकाल ९६.२७% लागला.अकलूजच्या शंकरराव मोहिते महाविद्यालयातून विज्ञान, कला,वाणिज्य, व्यवसाय अभ्यासक्रमातील ३९४ पैकी ३७८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. व निकाल ९५.९४ टक्के लागला.
सदाशिवनगरच्या कर्मवीर बाबासाहेब पाटील विद्यालय व ज्यूनियर कॉलेजमधील विज्ञान, कला,वाणिज्य शाखेतून १६० पैकी १५७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. व निकाल ९८.१३ टक्के लागला. अकलूजच्या जिजामाता कन्या प्रशालेतून विज्ञान शाखेतील १३६ पैकी १३६ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल १०० टक्के लागला आहे.वेळापूरच्या सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील विद्यालयातून कला विभागात ८८ पैकी ५८ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल ६५.९१ टक्के लागला.
नातेपुते येथील श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील विद्यालय व ज्युनियर कॉलेज येथील कला शाखेतून २७ पैकी २५ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल ९२.५९ लागला.
या यशाबद्दल संस्थेचे जेष्ठ मार्गदर्शक संचालक जयसिंह मोहिते पाटील,अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील, संचालिका कु.स्वरूपाराणी मोहिते पाटील,सचिव अभिजीत रणवरे,सहसचिव हर्षवर्धन खराडे पाटील,सर्व संचालक मंडळ, विविध शाखेचे पदाधिकारी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
*चौकट*
१०० पैकी १०० गुण मिळवणारे विद्यार्थी याप्रमाणे-
कु.मुस्कान युनूस सय्यद, पशुविज्ञान व दुग्ध व्यवसाय विषयात २०० गुण कु.अंकिता विलास सांगवे,कृषी विज्ञान व तंत्रज्ञान विषयात १०० गुण (दोन्ही विद्यार्थी सदाशिवराव माने विद्यालय अकलूज),कु.तक्षशिला नितीन दळवी,कृषी विज्ञान व तंत्रज्ञान विषयात १०० गुण.( जिजामाता कन्या प्रशाला अकलूज)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा