Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, २२ मे, २०२५

*नुकत्याच उद्घाटन झालेल्या तुळजापूर बस स्टँडला गळती संबंधित बांधकाम विभाग आणि ठेकेदार कारवाई करावी-- 'शाम पवार 'यांची मागणी*

 


*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-- 9730 867 448

काही दिवसापूर्वीच तुळजापूर येथील बस स्टॅन्ड चे उद्घाटन राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते संपन्न झाले आणि पहिल्याच पावसात एसटी स्टँडचे छताला गळती लागली त्यामुळे संबंधित बांधकाम विभाग व ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी धाराशिव जिल्हा उपप्रमुख श्याम पवार यांनी विरोधी पक्ष नेते रावसाहेब दानवे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे याबाबत मागील दोन वर्षापासून होत असलेल्या उत्कृष्ट दर्जाच्या कामाबाबत वेळोवेळी तक्रार करूनही अखेर काम उत्कृष्ट झाल्याने निवेदनाद्वारे केलेली मागणी पुढीलप्रमाणे.             

           

तुळजापूर ता. तुळजापूर येथील जुने बसस्थानकचे टॅपरुप (टेन्सल फॉर्बीक) हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे चालु असुन ते त्वरीत बंद करणे बाबत.  

संदर्भ:- 1) मा. विभागीय नियंत्रक महाराष्ट्र राज्य परीवहन महामंडळ धाराशिव    

    यांना दिलेले दिनांक 23/11/2023 रोजीचे पत्र

 2) मा. जिल्हाधिकारी साहेब जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव यांना         

    दिलेले दिनांक 23/11/2023 रोजीचे पत्र

 3) मा. मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकार, म.रा. मा. प. महामंडळ, मध्यवर्ती 

    कार्यालय , मुंबई यांना दिलेले दि. 20/12/2023 चे पत्र 

 4) मा. मुख्य अभियंता, म.रा. मा. प. महामंडळ, मध्यवर्ती कार्यालय , 

    मुंबई यांना दिलेले दि. 13/06/2024 चे पत्र 

 5) मा. महाव्यवस्थापक साहेब (क. व. औ.स.), म.रा. मा. प. महामंडळ, 

    मध्यवर्ती कार्यालय , मुंबई यांना दिलेले दि. 13/06/2024 चे पत्र 

 6) दिनांक 07/02/2024 रोजी रा. प. तुळजापुर आगार येथे विभागीय 

    कार्यालय येथुन आलेल्या वरीष्ठ अधिका-यांना दिलेल्या जबाबाची प्रत 

 7) मा. मा. ना. (श्री. प्रतापजी सरनाईक) पालकमंत्री, तथा म. रा. परीवहन     

   मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई यांना दिनांक 25/01/2025 रोजी दिलेले 

   निवेदन. 

महोदय,

 वरील विषयास अनुसरुन निवेदन देण्यात येते की, दिनांक 20/12/2023 रोजी आपणास श्री क्षेत्र तुळजापूर येथील जुने बसस्थानक पाडुन तेथे जे नविन बसस्थानक करण्यात येत असुन सदरील काम हे वाळु न वापरता दगडापासुन बनविलेले माती मिक्स टस्ट वापरुन बांधकाम करीत असले बाबत आपणास निवेदन दिले होते. सदर निवेदनावर आपल्या मार्फत आज तागायत कोणतीही कार्यवाही झाले नाही तसेच वरील विषयाच्या अनुषंगाने तुळजापूर येथील जुने बसस्थानकचे टॅपरुप (टेन्सल फॉर्बीक) हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे चालु असुन त्या कामामध्ये लोखंड हलक्या प्रतीचे वापरण्यात येत आहे. व त्याकामध्ये खालील प्रमाणे त्रुटी आहेत. 

1. दोन्ही पाईपमधील वेल्डींग जॉईंट हे प्रॉपर नाहीत.

2. पाऊडशन बोल्ट प्रॉपर डिझाईन प्रमाणे नाहीत(पब्लीक प्लेस असल्याने ते हावेच्या, वारा वादळाच्या प्रेशरने ते केव्हाही पडु शकतात)

3. पाऊंडशन बोल्ट हे प्लेटच्या वरती नटबोल्ट नाहीत. प्लेटच्या बाहेर आर.सी.सी. कॉलम प्लेटच्या 80+80 पाहिजे. परंतु ते नसल्याने कॉलम तुटुन पडु शकतात. 

4. 6 मीटरच्या पाईपला तुकडे जॉईंट होतो व 1 मीटर मध्ये 2 तुकडे जॉईंट स्ट्रक्चर अपरोल नाही.

5. 6 मीटरच्या पाईपला तुकडे जोडताना सिलीव्ह जॉईंट असतात परंतु एवढया मोठया स्टक्चर मध्ये इतके छोटे छोटे तुकडे जोडले आहेत की त्यामध्ये एकही सिव्हील जॉईंट नाही व प्रॉपर जॉईंट नाहीत. 

6. दोन पाईपच्या मध्ये डिझाईन प्रमाणे असा जॉईंट असतो की त्याप्रमाणे जॉईंट दिसुन येत नाही. 

7. पाऊंडेशन डिझाईन प्रमाणे काम केले नसुन सदरील कामाचे वरील 1 ते 7 प्रमाणे मुळ डिझाईन प्रमाणे काम होत नसुन सदरील काम हे वाजवी दरापेक्षा जास्त असुन ते काम निकृष्ट दर्जाचे काम चालु असुन उत्कृष्ट दर्जाचे काम होत नाही त्यामुळे आपली व महाराष्ट्र शासनाची दिशाभुल करुन थतर मतर काम करीत आहेत याबाबत आपल्या स्तरावर वरील संदर्भ व विषयास अनुसरुन चौकशी करुन संबंधितावर कायदेशीर कार्यवाही व संबंधित ठेकेदाराचा परवाना रद्द करण्यात यावा व श्री. क्षेत्र तुळजापुर येथील जुन्या बस स्टँडचे काम ईस्टिमेट प्रमाणे चांगल्या दर्जाचे काम करणा-या नवीन एजन्सी मार्फत काम करण्यात यावे. याबाबत आपण वरील संदर्भ व विषयाच्या अनुषंगाने योग्य ती चौकशी करुन कार्यवाही करण्यात यावी. जर भविष्यामध्ये या जुन्या बस स्टँड मध्ये पडझड किंवा जीवित हानी झाल्यास याला सर्वस्वी आपण स्वत: जबाबदार राहाल याची कृपया नोंद घ्यावी. 




 तसेच महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी दररोज लाखो भाविक महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातून तुळजापूरात येतात. या भाविकांच्या सोयीसाठी जुने बसस्थानक पाडून तब्बल आठ कोटी रुपये खर्च करून नवे आधुनिक बस स्थानक बांधण्यात आले. काही दिवसांपूर्वीच याचे उद्घाटन राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते मोठ्या थाटात पार पडले होते. मात्र अवकाळी पावसानेच या ‘आधुनिकते’चा फोलपणा उघड केला आहे. बस स्थानकाच्या छतावरून ठिकठिकाणी पाणी गळत असून, बसची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना व भाविकांना जागेवरच भिजत उभे राहावे लागत आहे. नव्या बस स्थानकातील ही स्थिती पाहता प्रवाशांमध्ये आणि स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. इतक्या मोठ्या खर्चानंतरही निकृष्ट दर्जाचे बांधकाम झाल्याचे यावरून स्पष्ट होत असून, संबंधित बांधकाम विभाग आणि ठेकेदारावर कारवाईची मागणी आता जोर धरू लागली आहे. तुळजाभवानी मातेच्या सेवेसाठी आलेल्या भाविकांना या पावसात त्रास सहन करावा लागत असताना, शासनाने तातडीने दखल घेऊन दोषींवर कारवाई करावी, 

  धन्यवाद...

           कळावे आपला,

       शाम अंबादासराव पवार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा