Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, २३ मे, २०२५

प्रा.रसूल साेलापुरे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

 


उपसंपादक - नूरजहाँ शेख

टाइम्स 45 न्युज मराठी

पुरस्काराचे मानकरी ठरले पाटील,हेंबाडे,माेहाेड,शिंदे प्रा.रसूल साेलापुरे बहुउद्देशीय संस्था,महागाव,ता.गडहिंग्लज,जि.काेल्हापूर (नाेंदणी क्रमांक ई -३७४०/काेल्हापूर) या संस्थेचे २०२४ चे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाले.यात लेखक प्रा.इंद्रजीत पाटील,बार्शी यांच्या ' शेलक्या बारा ' या कथासंग्रहाची कथाविभागात सर्वाेत्कृष्ट कथासंग्रह म्हणून निवड करण्यात आली.तर विशाल माेहाेड,अमरावती यांची ' कीड ' ही कादंबरी परीक्षकांना विशेष भावली.कवितासंग्रह विभागात कवी लक्ष्मण हेंबाडे,मंगळेढा यांच्या ' पांदवाट ' या कवितासंग्रहाला विशेष मान मिळाला.चाराेळीसंग्रह विभागात श्री.प्रकाश पाटील,काेल्हापूर यांचा 'नभांगण' हा चाराेळीसंग्रह परीक्षकांच्या नजरेत भरला.तर स्थानिक उत्कृष्ट वाचक पुरस्कारासाठी साै.रूपाली स्वप्नील शिंदे,मु.पाे.भादवळ,जि.काेल्हापूर यांची निवड करण्यात आली.अगदी तज्ञ परीक्षकांनी या साहित्यकृतींचे परीक्षण करून निवड केली असून संस्थेचे अध्यक्ष प्रा.रसूल साेलापुरे यांनी सदर साहित्यिक पुरस्काराची अधिकृतपणे घाेषणा केली.पुरस्कार प्राप्त साहित्यिकांचे विशेष अभिनंदन करून पुढील साहित्यिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.हे पुरस्कार येत्या जुलै महिन्यात निवड झालेल्या साहित्यिकांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहेत असे प्रा.रसुल साेलापुरे यांनी सांगितले.






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा