Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, ३१ मे, २०२५

*लवंग येथील संजय शिवाजीराव पाटील यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन*

 


*टाइम्स 45 न्यूज मराठी अकलूज

लवंग ग्रामपंचायतीचे माजी सदस्य संजय शिवाजीराव पाटील यांचे हृदय विकाराच्या धक्क्याने निधन झाले.ते ५३ वर्षांचे होते.त्यानी विजय प्रताप युवा मंचच्या सुरवातीच्या काळात उत्स्फूर्तपणे सामाजिक कार्यात सहभाग घेऊन.तालुक्यात त्यांनी वृक्षारोपण,रक्तदान शिबीर, फडतरी येथील बंधारा बांधणे अशा अनेक समाजोपयोगी उपक्रमात भाग घेतला होता. महाराष्ट्र राज्याचे माजी गृह राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांचे मेहुणे होते तर लवंग ग्रामपंचायतीचे सरपंच प्रशांत पाटील व माजी सरपंच निशांत पाटील यांचे ते चुलत बंधू होते.त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा व दोन मुली असा परिवार आहे.त्यांच्या दुःखात सहभागी होऊन सतेज पाटील,तेजस पाटील,आ.रणजितसिंह मोहिते- पाटील,जयसिंह मोहिते-पाटील, धवलसिंह मोहिते-पाटील,माजी आमदार रामभाऊ सातपुते, शिवतेजसिंह मोहिते-पाटील, हिंदुराव माने-पाटील,सुजय माने- पाटील,प्रताप पाटील यांनी भेट घेऊन सांत्वन केले.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा