*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
भारतीय सैन्य दलातून 17 वर्षाच्या सेवेनंतर सेवानिवृत्त झालेले सराटी ता.इंदापूर जि.पुणे येथील पोलीस हवालदार मुबारक पापाभाई तांबोळी यांनी बारामती तालुका व शहर नातेपुते इंदापूर अकलूज इत्यादी ठिकाणी 19 वर्ष महाराष्ट्र पोलीस दलात सेवा बजावून पोलीस दलातील सेवा पूर्ण झाल्यानंतर दिनांक 31 मे 2025 रोजी ते पोलीस दलातून सेवानिवृत्त झाले त्याबद्दल पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबईच्या रश्मी शुक्ला यांच्या आदेशानुसार आणि सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या वतीने सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी यांच्या शुभहस्ते व अकलूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निंभोरे साहेब यांच्या उपस्थितीत त्यांचा सपत्नीक, महासंचालकाच्या वतीने सन्मानपत्र व सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला त्यांनी व्यक्त केलेले सन्मानपत्र पुढीलप्रमाणे.
मुबारक पापाभाई तांबोळी हे
पोलीस दलातील प्रदिर्घ सेवा पूर्ण करून दि३१/५/२०२५ रोजी सन्मानाने सेवानिवृत्त झाले पोलीस दलातील आपली सेवा निश्चितच इतरांना प्रेरणादायी असणार आहे. पोलीस दलासाठी आपण केलेली सेवा ही अनमोल आहे.
महाराष्ट्र पोलीस दलाची कुटुंब प्रमुख या नात्याने, आपणास सेवानिवृत्तीनंतरचे आयुष्य तणावमुक्त व आरोग्यदायी जावो, अशी ईश्वरचरणी मी प्रार्थना करते.
पुन्हा एकदा आपणास सेवानिवृत्तीनंतरच्या वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा
*रश्मी शुक्ला (भा. पो.से)*
*पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा