Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, २९ जून, २०२५

*सांगली चे खासदार --विशाल पाटील हे जनतेच्या मनातील "राजाच"!* *खासदारकी ही लॉटरी नव्हती हे 2029 ला पुन्हा एकदा सिद्ध होईल!*

 


*इक्बाल बाबासाहेब मुल्ला--- सांगली (पत्रकार )*

  *मो;- 8983 587 160

"मतदार" हाच निवडणुकीत "मतदान" करणारा एकमेव "मतदारराजा" असतो, तथापि 2024 च्या लोकसभेच्या निवडणुकीत सांगलीतून *अपक्ष* असणाऱ्या आणि गेले 50 वर्ष *काँग्रेस* पक्षाचे *शिवधनुष्य* समर्थपणे पेलणाऱ्या "वसंतदादा पाटील" यांच्या घराण्यातील "विशाल पाटील" यांना आपले *पवित्र "मत* दिले, आपले *समर्थन* दिले, आणि विशाल पाटील यांना "निवडून" आणले. जनतेच्या मनात *अधिराज्य*" गाजवणारे विशाल पाटील हेच खरेखुरे "राजा" असल्याचे सांगलीच्या जनतेने "सिद्ध" केले आहे.

 *लॉटरी" म्हणजे कर्तुत्वाला कमी "लेखणे' होय !*  

उच्चशिक्षण मंत्री *श्री.चंद्रकांत पाटील* यांनी विशाल पाटील यांना "*लॉटरी*" लागली आहे ,तसेच ते योगायोगाने खासदार झाले असून *राजा* असल्याचा त्यांचा "अविर्भाव" असतो असे त्यांनी विधान केले आहे. 

वास्तविक *EVM* शिवाय भारतात "मतदान" झाल्यास, निवडणुका झाल्यास "लॉटरी"कुणाला लागते,आणि *धर्मनिरपेक्ष* भारतात कुठला पक्ष "बाजी" मारेल हे सुस्पष्ट दिसेल. तथापि मंत्री श्री.चंद्रकांत पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे विशाल पाटील हे *लॉटरी* चे खासदार नसून, 2024 साली जनतेने स्वतःहून *उठाव* केला होता व "स्वयंउर्जेतून" आपला उमेदवार म्हणून विशाल यांची "निवड" केली होती. 

विशाल पाटील यांच्यावर *अन्याय* झाला म्हणून सांगलीच्या जनतेने विशाल पाटील यांना "उच्चांकी" मतदानाने निवडून आणून "इतिहास" निर्माण केला. 

 *दिल्लीमध्ये* सांगलीच्या "विकासासाठी" लोकोपयोगी "प्रश्न" मांडून त्यांची *सोडवणूक* करणारे विशाल पाटील हेच 2029 च्या लोकसभा निवडणुकीत *बाजी* मारतील हा सांगलीकरांना "विश्वास" आहे.

  *श्री. संजय पाटील यांना मिळालेली मते कुणाची ??*

माझा एक प्रश्न आहे,भाजपच्या संजय पाटील या माजी खासदारांना लोकसभा निवडणुकीत भाजपच्या "नाराज" *आमदारांचा* विरोध होता का?? नाराज कार्यकर्त्यांचा *विरोध* होता का?? नाराज *नगरसेवकांचा* विरोध होता का ?? जर असे असेल तर मग संजय पाटील यांना मिळालेली 4 लाखापेक्षा जास्त मते ही *कुणाची* आहेत ??? का ती *EVM* च्या "आशीर्वादाची" आहेत ??? मतदार अजूनही "संभ्रमात" आहे याचे कारण काय ???

*नातसून ही भाजपाची धूर्त खेळी !* 

दुसरा मुद्दा हा की काँग्रेस पक्षाने "जयश्रीवाहिनी पाटील" यांची *मनधरणी* करायला हवी होती व त्यांचे *निलंबन* देखील "रद्द" करायला हवे होते. स्व. *मदनभाऊंच्या* पश्चात त्यांनाच काँग्रेसची "उमेदवारी" द्यायला हवी होती. ही काँग्रेसची *घोडचूकच* आहे .परंतु तो काँग्रेस पक्षाचा तो अंतर्गत "प्रश्न" आहे. त्यांच्या *चुका* दाखवून भाजपाला काय फायदा ?? *मोदी* यांच्यापेक्षा *पंतप्रधानपदी श्री. नितीन गडकरी* "यथायोग्य" आहेत,असे कोणी सांगितले तर त्याचा काही "उपयोग" आहे का ?? अगदी तसेच ..! 

वास्तवीक *जयश्रीवाहिनी* पाटील या *स्व.विष्णूअण्णा पाटील* यांच्या "सून" आहेत. *स्व .वसंतदादा पाटील* यांच्या सून नव्हेत. *शैलजाभाभी* पाटील या वसंतदादा पाटील यांच्या *खऱ्या सून* आहेत. सख्खी व चुलत एवढाच काय तो फरक !  

वसंतदादा पाटील यांचे सुपूत्र म्हणजे स्व. प्रकाशबापू पाटील होय. त्यांची प्रतीक व विशाल ही दोन मुले.त्यांच्या पत्नी म्हणजे *ऐश्वर्या* आणि *पूजा* या *नातसून*. 

परंतु *भाजपा* आणि अन्य सोशल मीडियावरून वसंतदादा यांच्या "नातसुनेने" भाजपात प्रवेश केला असा *कांगावा* केला गेला. 

वास्तविक वसंतदादा बंडूजी पाटील यांचे सख्खे भाऊ म्हणजे *शामराव बंडूजी पाटील*! . त्यांची 4 मुले म्हणजे *विष्णुअण्णा* ,विश्वासबा पू , शंकरबापू आणि अरविंदबापू हे होय. विष्णुअण्णा पाटील यांचे सुपूत्र *मदन पाटील* ,विजय पाटील हे होय. आणि मदन पाटील यांच्या पत्नी म्हणजे *जयश्री पाटील*. ऐश्वर्या आणी पूजा याच वसंतदादा पाटील यांच्या *नातसून* होय .जयश्री पाटील या "*चुलत नातसून*" आहेत "सख्ख्या" नातसून नव्हेत हे लक्षात घ्यायला हवे. पाटील "घराणे" हे *एकसंघ* व एकत्रचं आहे परंतु "फरक" हा असा आहे.

तात्पर्य , वसंतदादा यांच्या नातसुनेचा आणि भाजपचा काडीमात्र *संबंध* नाही हे "सूर्यप्रकाशाइतके" स्पष्ट दिसत आहे.

विशाल यांचे *महत्व* कमी करणे किंवा वाढवणे हे सर्वस्वी *मतदारांच्या* हातात आहे. 2029 ला ते कुणाला आपले "पवित्र मत" देतात ते एव्हाना ते सिद्ध होईलचं ! 


*इकबाल बाबासाहेब मुल्ला* 

( *पत्रकार* )

संपादक - सांगली वेध 

संपादक - वेध मीडिया न्यूज,सांगलीn.

मोबाईल - 8983587160

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा