Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, २९ जून, २०२५

श्री संत गुलाबबाबा पालखी सोहळ्याचे ३० जुनला पंढरपूरकडे प्रस्थान महाराष्ट्रासह वेगवेगळ्या राज्यांतून भक्तांची उपस्थिती राहणार : पालखी सोहळ्याचे २० वे वर्ष

 


*कार्यकारी संपादक एस. बी. तांबोळी मोबाईल नंबर 8378081147

-----: इंदापूर तालुक्यातील रेडा गावामधून सालाबादप्रमाणे श्री संत गुलाबबाबा पायी पालखी सोहळा श्री क्षेत्र गुलाबनगर (रेडा) ते श्री क्षेत्र पंढरपूर हा आषाढ शुद्ध सोमवारी (दि.३०) जून रोजी सायंकाळी ४ वाजता. पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. या पालखी सोहळ्यामध्ये भारतातील विविध राज्यातून श्री संत गुलाबबाबांचे भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.


यावेळी अॅड. गोपाल उमक, अध्यक्ष श्री संत गुलाबबाबा समाधी मंदिर ट्रस्ट श्री क्षेत्र टाकरखेड (मोरे) ता. अंजनगाव सुर्जी, जि. अमरावती व श्री संत गुलाबबाबा यांचे वंशज तसेच प्राध्यापक नरेंद्र पलांदुकर, अध्यक्ष श्री संत गुलाबबाबा संस्थान काटेल धाम ता. संग्रामपूर, जि. बुलढाणा, चंद्रकुमार अग्रवाल सचिव सिद्धेश्वर श्री संत गुलाबबाबा समाधी मंदिर टाकरखेडा (मोरे) अध्यक्ष श्री संत गुलाबबाबा प्रतिष्ठान पंढरपूर यांच्या हस्ते या पालखी सोहळ्याचे प्रस्थान होणार आहे


या पालखी सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक विश्वासराव पवार, गोपाल रोकडे (पुणे), उद्योजक रमेश हिरे, डॉ. शिवाजीराव पाटील सचिव श्री संत गुलाबबाबा प्रतिष्ठान पंढरपूर, पैलवान दामोदर वानखडे (आमला, दर्यापूर), गोपाल कोलते (मलकापूर) शाहीर मुरलीधर लोणाग्रे मुख्य प्रचारक श्री संत गुलाबबाबा संस्थान काटेल धाम, 


उद्योजक कमलाकर बागुल (नंदुरबार), प्रकाश देशमुख मुख्य प्रवर्तक बँक ऑफ बडोदा मुंबई निशिकांत लाड,पै. अशिष शिरगावकर(वस्ताद ),मनोहर म्हात्रे, भूषण शिंदे, भगवान म्हात्रे, संतोष राऊत (अलिबाग), हेमंत पाटील,मनोज म्हात्रे,प्रकाश मिसाळ,आर.जी.पाटील,(नंदुरबार )आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. 


पालखी मुक्कामाची ठिकाणी पुढीलप्रमाणे ३० जून मुक्काम मारुती मंदिर, रेडा,१ जुलै-सराटी, २ जुलै मायनर सेक्शन (महाळुंग), ३ जुलै वाघजाई वस्ती (बंडीशेगांव), ४ जुलै-वाखरी, ५ जुलै ते ७ जुलै श्री संत गुलाबबाबा आश्रम पंढरपूर गोपाळपूर या ठिकाणी मुक्काम होणार असून, गोपाल काळा झाल्यानंतर पालखी सोहळ्याचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे.


या पालखी सोहळ्यामध्ये ह. भ. प. रणजित महाराज शिंदे (जंक्शन), बोधले महाराज (वडापुरी), शिवाजी किर्दक महाराज (दहिगांव), संतोष महाराज कांबळे (राजवडी), अशोक महाराज मोहिते (रेडा), प्रसिद्ध लोकशाहीर मुरलीधर लोणाग्रे महाराज (तेल्हारा) मुख्य प्रचारक श्री संत गुलाबबाबा संस्थान काटेल धाम, दिनानाथ आळंदीकर महाराज यांची कीर्तन सेवा होणार आहे. अशी माहिती श्री संत गुलाबबाबा पालखी सोहळ्याचे प्रमुख, संस्थांचे अध्यक्ष अॅड. तानाजीराव देवकर, सचिव तुकाराम जगदाळे यांनी दिली. यावेळी संत गुलाबबाबा पालखी सोहळ्याचे मुख्य चोपदार ज्ञानदेव गोळे ,बाळासाहेब कुंभार आदी विश्वस्त मंडळी उपस्थित होती.

_______

सोबत फोटो:-

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा