Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, १५ जून, २०२५

*आस्था रोटी बँक कडून 600 गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप* *सोमशेट्टी चॅरिटेबल ट्रस्ट उडान पंख माणुसकी चे...*

 


*सोलापूर --प्रतिनिधी*

  *आबेद. बागवान*

  *टाइम्स 45 न्यूज मराठी

सोलापूर – गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी आस्था रोटी बँक यांच्यातर्फे मोफत शालेय साहित्य वाटप उपक्रम मोठ्या उत्साहात राबवण्यात आला. या उपक्रमांतर्गत तब्बल ६०० विद्यार्थ्यांना आवश्यक शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.


या विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेंसिल, दप्तर, रंगवह्या, कंपास बॉक्स अशा शालेय जीवनात उपयुक्त वस्तू विनामूल्य देण्यात आल्या. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि आत्मविश्वास पाहून कार्यक्रमाचे महत्त्व अधोरेखित झाले.

प्रथमता मान्यवरांच्या हस्ते सरस्वती मातेचे पूजन करण्यात आले 

त्यानंतर प्रमुख पाहुणे अँड प्रदीपसिंग राजपूत जिल्हा सरकारी वकील,मा राघवेंद्र सोमशेट्टी,मा अमित कांबळे,मा अनुराधा बाहेती, राजू हौशेट्टी, विजय करवा, मीरा देसाई, सुनील शरणार्थी, या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते अनाथ मुलं व मुलींना तसेच एचआयव्ही ग्रहस्थ यांच्या मुलांना तसेच कुष्ठरोग वसाहत मधील मुलांना व झोपडपट्ट्यामधील गरीब मुलांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले आहे 

प्रथम आस्था रोटी बँकेचे महिला सदस्य छाया गंगणे यांनी प्रस्ताव मांडले आस्था रोटी बँकेबद्दल माहिती दिली. 

या उपक्रमाचे आयोजन "भुकेल्यांना अन्न... हाच खरा माणुसकीचा धर्म!" या तत्त्वज्ञानावर चालणाऱ्या आस्था रोटी बँक या सामाजिक संस्थेने केले. गेली ९-१० वर्षे ही संस्था सोलापूर शहरात गरजू, निराधार, ज्येष्ठ नागरिक व अपंग व्यक्तींना दररोज मोफत अन्नवाटप सेवा पुरवते.

संस्थेचे स्वयंसेवक, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षकवर्ग आणि पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. "शिक्षण हीच खरी शक्ती आहे" या भावनेने प्रेरित होऊन हा उपक्रम राबवण्यात आल्याचे संस्थेचे विजय छंचुरे यांनी सांगितले.

आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँकेचे सदस्य कांचन हिरेमठ, नीलिमा हिरेमठ, संपदा जोशी, ज्योत्स्ना सोलापूरकर,निता आकुडे, संगीता छंचुरे, श्रद्धा अध्यापक, अनिता तालिकोटी, पुष्कर पुकाळे, विनोद भोसले, अविनाश मार्चला,सुमित मर्दा, नरेंद्र करवा, कन्हैया सोनी, मुस्कान सोमाणी, राजेश लाहोटी, अंकित झंवर, प्रविण काबरा, विजय करवा हे सर्वजण उपस्थितीत होते

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन छाया गंगणे केले तर आभार प्रदर्शन स्नेहा वनकुद्रे केले



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा