*विशेष---प्रतिनिधी*
*राज(कासिम) -मुलाणी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
पिंपरी- चिंचवड : पुण्यातील मावळमध्ये कुंड मळ्यात पूल कोसळल्याने काही पर्यटक बुडाल्याची माहिती मिळत आहे. ही घटना आज दि-१५ जुन रोजी दुपारी स
३/३०वाजणेच्या सुमारास घडल्याचं सांगण्यात येत आहे. घटनास्थळी पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयातील तळेगाव दाभाडे पोलीस दाखल झाले आहेत. कुंडमळा ओलांडण्यासाठी, या बाजूवरून दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी पूल आहे. हाच पूल कोसळला आहे.
मावळ मधील कुंडमळा हा पर्यटन स्थळांपैकी एक आहे. आज रविवार सुट्टीचा दिवस असल्याने अनेक पर्यटक त्या ठिकाणी गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पर्यटकांची संख्या पूलावर जास्त झाल्याने हा पूल कोसळल्याच बोललं जात आहे. अद्याप कुंड मळ्यात किती पर्यटक बुडाले आहेत. याबाबत अद्याप आकडा स्पष्ट होऊ शकला नाही. २० ते २५ जण बुडाल्याची भीती व्यक्त होत आहे. घटनास्थळी अग्निशमन दल, मावळ वन्यजीव रक्षक यांची टीम पोहचली आहे. बचावकार्य सुरू आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा