Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, १५ जून, २०२५

साहित्य माणिक पुरस्काराने इंद्रजीत पाटील सन्मानित

 


उपसंपादक - नूरजहाँ शेख

टाइम्स 45 न्युज मराठी

कवीश्रेष्ठ ना.घ.देशपांडे साहित्य नगरी मे ए.साे.कला व वाणिज्य महाविद्यालय रामनगर,मेहकर जिल्हा बुलढाणा याठिकाणी सुप्रसिद्ध कवी व लेखक प्रा.इंद्रजीत पाटील यांना साहित्य माणिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.हा पुरस्कार त्यांना त्यांच्या ' कळ पाेटी आली आेठी ' या परिपूर्ण अष्टाक्षरी कवितासंग्रहासाठी देण्यात आला.या कवितासंग्रहासाठी यावर्षीचा मिळालेला हा नववा पुरस्कार असून त्यांना आत्तापर्यंत पस्तीस राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत.तिसऱ्या एकदिवसीय राज्यस्तरीय साहित्य जगत मराठी साहित्य संमेलनात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.हा पुरस्कार अकाेल्याचे सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा.माेहन काळे यांनी प्रतिनिधी म्हणून स्वीकारला.आकर्षक सन्मानचिन्ह,सन्मानपत्र,शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ व राेख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप हाेते.प्रस्तुत पुरस्कार संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक रामदास राजेगांवकर,स्वागताध्यक्षा कवयित्री व लेखिका साै.सुवर्णा मुळजकर,उदघाटक मा.श्री.विजयजी चऱ्हाटे,निमंत्रक मा.श्री.विकास राऊत व इतर प्रमुख मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला.याप्रसंगी बहुतांशी रसिक श्राेते व साहित्यिकही उपस्थित होते.दुपारच्या सत्रात बहारदार कविसंमेलनाचाही कार्यक्रम आयोजित केला हाेता.या संस्थेचे सर्वेसर्वा मा.श्री.भगवान राईतकर सर व त्यांच्या कार्यकर्त्यांनी सदर साहित्य संमेलनाचे उत्तम नियोजन केले हाेते.इंद्रजीत पाटील यांच्या या साहित्यिक कामगिरीचे सर्वत्र काैतुक हाेत असून प्रकाश सकुंडे गुरूजी, चंद्रकांत पाटील,संजय भड,अमाेल देशमुख व जीवराज गरड यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले व पुढील साहित्यिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा