*कार्यकारी संपादक एस. बी. तांबोळी मोबाईल नंबर 8378081147
:----- संतश्रेष्ठ जगतगुरु तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा पुणे जिल्ह्यातील शेवटच्या सराटी मुक्कामी तळाची व नीरा नदीतील पादुकांच्या शाही स्नान ठिकाणची पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी भेट देवून पाहणी केली.
याप्रसंगी प्रांताधिकारी वैभव नावाडकर, तहसीलदार जिवन बनसोडे, गटविकास अधिकारी सचिन खुडे, समीर तांबोळी, उपसरपंच संतोष कोकाटे, तलाटी, ग्रामसेवक आदी मान्यवरांसह अधिकारी उपस्थित होते.
पालखी मार्गावरील पुणे जिल्ह्यातील सराटी हे शेवटचे मुक्कामाचे ठिकाण आहे. येथे मोठ्या संख्येने वारकरी मुक्कामाला असतात. त्यासाठी विज, पिण्याचे व वापरण्याचे पाणी, शौचालय, अंघोळीचे योग्य नियोजन व सुरक्षा व्यवस्थेची गरजेची असल्याने त्याची योग्य ती काळजी करण्याच्या सुचना आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले.
यावेळी गर्दी नियंत्रण, वाहतूक व्यवस्थापन, वैद्यकीय मदत, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, तसेच आपत्कालीन परिस्थितीत वापरण्यात येणाऱ्या यंत्रणेचा आढावा घेण्यात आला. यावर्षी पालखी सोहळ्यास मोठ्या प्रमाणात वारकऱ्यांची गर्दीची शक्यता नाकारता येत नाही. ग्रामपंचायत, स्थानिक नागरिक, स्वयंसेवी संस्था आणि पालखी सोहळा मंडळ यांनी समन्वय ठेवून शांततेत सोहळा पार पाडण्याचे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी पालखी मुक्कामी तळाची, नीरा नदीवरील पादुकांच्या शाही स्नानाच्या परिसराची व मार्गांची पाहणी करून संभाव्य अडचणी संदर्भात सूचना दिल्या. सराटी ग्रामस्थ आणि वारकरी मंडळींनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.
फोटो - सराटी येथील पालखीतळ, नीरा स्नानाच्या ठिकाणची पाहणी करताना आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार व अधिकारी दिसत आहेत.
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा