*कार्यकारी संपादक एस. बी. तांबोळी मोबाईल नंबर 8378081147
-----पिंपरी बुद्रुक येथे लोकनेते महादेवराव बोडके दादा विद्यालयात शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प व शालेय पाठयपुस्तके देऊन स्वागत करण्यात आले.
पिंपरी बुद्रुक येथील लोकनेते महादेवराव बोडके दादा विद्यालयात शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव साजरा करणेत आला. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती सुभद्राबाई महादेवराव बोडके यांनी नवीन विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प व शालेय पाठयपुस्तके देऊन स्वागत केले. यावेळी प्रभाकर बोडके, संतोष सुतार, वर्धमान बोडके, श्रीकांत बोडके, समाधान बोडके व ग्रामस्थ तसेच शाळेचे मुख्याध्यापक भारत कोरटकर, केंद प्रमुख संतोष साबळे सर तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
नवीन विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प व शालेय पाठयपुस्तके देऊन स्वागत करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारे आनंद ओसंडून वाहत होता.
फोटो - पिंपरी बुद्रुक येथील लोकनेते महादेवराव बोडके दादा विद्यालयात शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा