लग्न मनाचे मिलन
लग्न पवित्र बंधन।
लग्न पालकांचे ऋण
लग्न जीवन नंदन।।
लग्न प्रितीची आरंभ
लग्न हक्काचा आधार।
लग्न स्वप्नाची पुर्तता
लग्न सुखाचा संसार।।
लग्न कुटूंबाची जोड
लग्न नशीबाचा खेळ।
लग्न स्वर्गातील गाठ
लग्न मनाचा हा मेळ।।
लग्न घराला आधार
लग्न हे विश्वासावर।
लग्न गुणांना आकार
लग्न दोषांचा स्विकार।।
लग्न आनंदाचे कार्य
लग्न दोघे समजून।
लग्न दोघे जूळवून
लग्न दोघे समर्पण।।
अनिसा सिकंदर
९२७००५५६६६
ता.दौंड जि.पुणे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा