*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
तुळजापूर तालुक्यातील मौजे तामलवाडी येथील ग्रामपंचायतने तेथील औद्योगिक वसाहतींमधील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त नावाजलेल्या कंपन्यांनी त्यांच्याकडून भरण्यात येणाऱ्या करासंदर्भातील बिल द्यावी व नेमलेल्या कर मोजमाप समितीने अहवाल तत्काळ बनवून प्रसिद्ध करून त्या कराची वसुली कारवाई करण्यात यावी याकरिता श्री सावंत शिवाजी रामकृष्ण (माजी सैनिक) तथा अध्यक्ष, आशा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, तामलवाडी यांनी २४ जून २०२५ रोजी ग्रामपंचायत कार्यालय तामलवाडी समोर आमरण उपोषण सुरू केले होते त्यावेळी आंदोलनादौरान प्रशासनामार्फत गटविकास अधिकारी,पंचायत समिती तुळजापूर यांनी फोनद्वारे श्री सावंत (माजी सैनिक) यांना प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्याकरिता कमिटी स्थापन (कर मोजमाप) करण्यात आले आहे त्याबाबतचे लेखीपत्र व ही कमिटी ०१ (एक) महिन्यात औद्योगिक वसाहतीचे मोजमाप करून त्यांचा अहवाल तत्काळ सादर करून त्याप्रमाणे वसुली कारवाई करेल असे कळवले व आशा आशयाचे पत्र प्रशासनाच्यावतीने श्री आगतराव कावळे, विस्तार अधिकारी (पंचायत) तुळजापूर, श्री तुकाराम ढेरे, कनिष्ठ अभियंता पंचायत समिती तुळजापूर यांनी श्री सावंत शिवाजी रामकृष्ण (माजी सैनिक) तथा संस्थापक अध्यक्ष आशा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था तामलवाडी यांना देऊन प्रशासनास सहकार्य करावे ही विनंती केली त्याप्रमाणे श्री सावंत यांनी प्रशासनाच्या विनंतीस मान करून आपले आमरण उपोषण तात्पुरते स्थगित केले आहे व ०१ (एक) महिन्यापर्यंत जर अहवाल तयार झाला नाही व त्याची अमलबजावणी नाही झाल्यास गटविकास अधिकारी पंचायत समिती तुळजापूर यांच्या कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचे लेखी स्वरूपात कळवले आहे याकडे सर्व परिसरातील लोकाचे लक्ष वेधून गेले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा