Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, २१ जून, २०२५

*अकलूज येथील शंकरराव मोहिते महाविद्यालयात" जागतिक योगा दिन" साजरा*

 


*अकलूज --प्रतिनिधी*

*केदार---- लोहकरे*

*टाइम्स 45 न्यूज मराठी

अकलूज येथील शंकरराव मोहिते महाविद्यालयामध्ये 'जागतिक योग दिन' मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमला प्रमुख पाहुणे म्हणून 

योग प्रशिक्षक दत्ता डांगे होते.

           'मन,मेंदू,मनगट यांचा समन्वय योग्य साधायचा असेल तर योग साधना व दररोज योगासने करून शरीर बळकट करणे आवश्यक आहे' असे मत जागतिक योग दिनानिमित्त योग प्रशिक्षक दत्ता डांगे यांनी व्यक्त केले.दि. २१ जून २०२५ रोजी शंकरराव मोहिते महाविद्यालय अकलूज येथे जागतिक योग दिन साजरा करण्यात आला. योगदिनानिमित्त महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शिवप्रसाद टिळेकर यांनी सर्व उपस्थितांना योगदिनाच्या शुभेच्छा देऊन दररोज शरीर सौष्ठवासाठी योगासने व्यायाम करणे गरजेचे असून 'दिसामासी एक योगासन करावे 'असा संदेश अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना दिला.      



           योग दिनाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यक्रम अधिकारी प्रा.सज्जन पवार,प्रा. दत्तात्रय मगर, डॉ.स्मिता पाटील,जिमखाना प्रमुख प्रा.खंडाप्पा कोरे,एनसीसी प्रमुख प्रा.नंदकुमार गायकवाड,प्रा. अरविंद शेंडगे, कार्यालयीन अधीक्षक राजेंद्र बामणे यांनी प्रयत्न केले.या कार्यक्रमासाठी ज्युनियर विभाग, सीनियर विभागातील प्राध्यापक वृंद, एनएसएस,एनसीसी,जूनियर विभागातील विद्यार्थी,विद्यार्थिनी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा