*विशेष---प्रतिनिधी*
*राज(कासिम) -मुलाणी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
उजनी धरणात आज दिनांक 20 जून 2025 रोजी 63% पाणीसाठा झाल्याने भीमा नदी काठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देणेबाबत. कार्यकारी अभियंता उजनी धरण व्यवस्थापन विभाग विमान नगर कार्यालयाने सोलापूरचे जिल्हाधिकारी यांना पत्रकार द्वारे सुचित केले आहे
याबाबत सविस्तर वृत्तांत आशिकी
उपरोक्त विषयान्वये सविनय सादर करण्यांत येते को, उजनी धरणात आज दि. २०.०६.२०२५ रोजी सकाळी ९ वाजता ६३.३०% इतका पाणी साठा झालेला आहे. तसंच सद्यस्थितीत पुणे जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रामधील सततच्या पावसामुळे तसेच उजनी धरणाच्या ऊध्वं भागातील धरणांमधून सोडण्यात आलेल्या विसगांमुळे उजनी धरणाच्या पाणी पातळी मध्ये सातत्याने वाढ होत आहे. दौड पंचोल सरोता मापन केंद्र या ठिकाणावरून पाण्याची आवक सदयस्थितीत ७०००० क्यूसेक्स एवढी आहे व त्यामध्ये सातत्याने वाढ होत आहे.
उजनी धरणाचे पूरनियंत्रणासठी पाणलोट क्षेत्रातील पर्जन्यमान व उध्वं भागांमधील धरणांमधून सोडलेला विसर्ग व येणारी पाण्याची आवक लक्षात घेता पूरनियंत्रणासाठी आवश्यकतेनुसार उजनी धरण सांडव्यावरून भीमा नदीपात्रामध्ये केव्हाही विसर्ग सोडण्याची शक्यता आहे.
तरी नदी काठांवरील गावांना व नागरिकांना आपले स्तरावरून सतर्कतेचा इशारा देणेबाबत विनंती आहे हे आपले माहितीसाठी व पुढील कार्यवाहीसाठी सविनय सादर.
कार्यकारी अभियंता
उजनी धरण व्यवस्थापन विभाग भीमानगर.
प्रत मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर/पुणे यांना माहितीसाठी व आवश्यक कार्यवाहीसाठी सविनय सादर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा