*कार्यकारी संपादक एस. बी. तांबोळी मोबाईल नंबर 8378081147
----- पुणे जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी सराटी (ता. इंदापूर) येथे भेट दिली. यावेळी त्यांनी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या मुक्कामस्थळ, पादुका नीरा स्नानाच्या ठिकाणची पाहणी केली.
याप्रसंगी अतिरिक्त पोलिस अधीक्षक गणेश बिराजदार, उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड, इंदापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुर्यकांत कोकणे, सहाय्यक पोलिस निरीक्षक शंकर राऊत, राजकुमार डुणगे, समीर तांबोळी, राजेंद्र कुरळे, सुधीर भैय्या कोकाटे, रोहित जगदाळे, मनोज जगदाळे, राहुल जगदाळे, बाबा कोकाटे आदी मान्यवर उपस्थित होते.
पालखी मार्गावरील पुणे जिल्ह्यातील सराटी हे शेवटचे मुक्कामाचे ठिकाण आहे. येथे मोठ्या संख्येने वारकरी मुक्कामाला असतात. त्यासाठी योग्य नियोजन व सुरक्षा व्यवस्थेची गरज असते. पोलिस अधीक्षक गिल यांनी ग्रामस्थ व पोलिस अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. यावेळी पोलिस अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. गर्दी नियंत्रण, वाहतूक व्यवस्थापन, वैद्यकीय मदत, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, तसेच आपत्कालीन परिस्थितीत वापरण्यात येणाऱ्या यंत्रणेचा आढावा घेण्यात आला. यावर्षी पालखी सोहळ्यास मोठ्या प्रमाणात वारकऱ्यांची गर्दी अपेक्षित आहे. गस्त वाढवण्यासोबतच सीसीटीव्ही आणि ड्रोनच्या साहाय्याने देखरेख वाढवण्याचे निर्देश त्यांनी दिले. पोलिस अधीक्षक गिल यांनी स्थानिक नागरिक, स्वयंसेवी संस्था आणि पालखी सोहळा मंडळ यांनी समन्वय ठेवून शांततेत सोहळा पार पाडण्याचे आवाहन केले.
यावेळी संदिपसिंग गिल यांनी पालखी सोहळा शांततेत पार पाडावा, कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही यासाठी पोलिस प्रशासन सज्ज आहे, असे स्पष्ट केले. यावेळी पालखी मुक्कामी स्थळाची, नीरा नदीवरील पादुका स्नानाच्या परिसराची व मार्गांची पाहणी करून संभाव्य अडचणी व गर्दीच्या ठिकाणांची नोंद घेवून सूचना दिल्या. सराटी ग्रामस्थ आणि वारकरी मंडळींनी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
फोटो - सराटी येथील पालखीतळ, नीरा स्नानाच्या ठिकाणची पाहणी करताना संदिपसिंह गिल व अधिकारी दिसत आहेत.
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा