Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, १२ जून, २०२५

इंदापूरचे पोलिस हवालदार विष्णू केमदारने बेपत्ता झाल्याची तक्रार पत्नी प्रियांका केमदारने यांनी इंदापूर पोलिस ठाण्यात केली दाखल

 



*कार्यकारी संपादक एस. बी. तांबोळी मोबाईल नंबर 8378081147

----- इंदापूर येथील पोलिस हवालदार विष्णू सुभाष केमदारने (वय ३९) हे बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांची पत्नी प्रियांका केमदारने यांनी इंदापूर पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. यावेळी पोलिस निरीक्षक यांनीच केमदारने यांना जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला.

    प्रियांका केमदारने यांनी दिलेल्या तक्रार अर्जानुसार, मंगळवारी (ता. १०) सकाळपासून त्यांचे पती पोलिस हवालदार विष्णू केमदारने हे इंदापूर पोलिस ठाण्याच्या शासकीय वसाहतीतून बेपत्ता झाले असल्याचे लक्षात आले. त्यांनी शोधाशोध करीत असताना घरात एक चिठ्ठी मिळून आली. त्यानुसार मागील दोन महिन्यांपासून पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी पोलिस हवालदार रासकर आणि पोलिस कॉन्स्टेबल सूर्यवंशी यांच्या सांगण्यावरून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. तसेच, तुझी नोकरी व यापुढील आयुष्य हे उद्ध्वस्त करून टाकेल, अशी भाषा वापरून मला जीवे मारण्याची धमकी दिली आहे, असे लिहिले आहे. असा आरोप केमदारने यांच्या पत्नीने केला आहे. यावरून इंदापूर पोलिस स्टेशन येथे बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

   दरम्यान, विष्णू केमदारने हे इंदापूर पोलिस ठाण्यामध्ये प्रतिनियुक्तीवर कार्यरत होते. त्यांच्याबाबत वारंवार अनेक तक्रारी येत असल्याने त्यांना २७ एप्रिल २०२५ रोजी त्यांचा इंदापूर पोलिस ठाण्याकडील पदभार काढण्यात आला होता, भिगवण पोलिस ठाण्याकडे त्यांना रुजू होण्यासाठी कळवण्यात आलं होतं. मात्र त्यांनी भिगवन पोलिस ठाण्याचा पदभार स्वीकारला नव्हता. तरी त्यांच्या पत्नीच्या तक्रारीवरून बेपत्ता झाल्याची नोंद घेण्यात आली असून त्यानुरूप पुढील तपास सुरू आहे, असे सूर्यकांत कोकणे यांनी सांगिले. याबाबत उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड म्हणाले, "संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांच्या पत्नीची तक्रार दाखल करून घेतली आहे. पोलिस खात्याकडून या कर्मचाऱ्यांचा शोध घेतला जात असून त्या कामी पोलिस पथक तयार केले आहे. चिठ्ठीमध्ये केमदारणे यांनी जे आरोप केले आहेत त्या आरोपांची वरिष्ठ कार्यालयाकडून चौकशी केली जाईल त्या पद्धतीचा अहवाल पाठवला जाईल."

---------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा