*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
धाराशिव (उस्मानाबाद) जिल्हा समाजवादी पार्टीच्या जिल्हाध्यक्षपदी तुळजापूर तालुक्यातील आपसिंगा येथील सामाजिक कार्यकर्ते -अमीर शेख यांची फेरनिवड करण्यात आली आहे. मुंबई येथे समाजवादी पक्षाचे नेते तथा प्रदेशाध्यक्ष आमदार .अबू आझमी यांच्या हस्ते अमीर शेख यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन समाजावादी पक्षाने अमीर शेख यांना पुन्हा जिल्हाध्यक्ष पदाची संधी दिल्याचे बोलले जात आहे. शेख यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षाचे कार्यही सुरू केले आहे. समाजवादी पक्षाच्या गावोगावी शाखा काढून पक्षाची ताकद वाढविणार असल्याचे यावेळी अमीर शेख यांनी टाइम्स 45 न्यूज मराठी शी बोलताना सांगितले.
"*अमीर शेख" यांची (उस्मानाबाद) धाराशिव जिल्हा समाजवादी पार्टीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल टाइम्स 45 न्यूज मराठी च्या वतीने हार्दिक शुभेच्छा*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा