Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, ७ जून, २०२५

*शांती सदभावना मानवता आणि सह्रदयता याचा सुरेख संगम असणाऱ्या सर्व भारतीयांना ईद मुबारक-- इक्बाल बाबासाहेब मुल्ला (सांगली)*

 


*इकबाल बाबासाहेब मुल्ला*

*पत्रकार. --- (सांगली)*

 *मो:-8983 587 160

*सर्व भारतीयांना ईद मुबारक !*

शांती - सदभाव - मानवता आणि *सहृदयता* याचा सुरेख संगम असणारा, *हिंदू - मुस्लिम* बांधवांमध्ये प्रेम - बंधुभाव आणि *सर्वधर्मसमभाव* चा "मिलाफ असणारा *ईद - अल - अजहा* अर्थात बकरी ईद सांगलीसह संपूर्ण महाराष्ट्रात,भारतात मोठ्या "उत्साहात" साजरा झाला.

यावेळी ईदगाह वर जमलेल्या मुस्लिम बांधवांना *जनसुराज्य* पक्षाचे नेते माझे मित्र *समित कदम* , पोलीस अधीक्षक *प्रदीप घुगे*, पद्माकर जगदाळे, दिग्विजय सूर्यवंशी ,राजेश नाईक, मयूर पाटील,मंगेश चव्हाण, जावेद मुल्ला , रफिक शेख (don) अशा नामांकितांनी शुभेच्छा दिल्या !  

मुस्लिम समाजाचे रमजान ईद आणि बकरी ईद हे महत्वाचे सण असतात, परंतु यावेळी लोकप्रिय *आमदार* आणी दमदार *खासदारांची* *अनुपस्थिती* "चर्चेचा विषय" ठरली. असो, 

ईदगाह मध्ये नमाजपठण करण्यासाठी सांगलीत *ईदगाह कमेटी* च्या माध्यमातून जय्यत तयारी झाली होती. अध्यक्ष *मुन्ना कुरणे*, आणि *सर्व संचालकांच्या* माध्यमातून ईदगाह मैदानावर "यशस्वीरीत्या" नमाजपठण झाले. 

ईदगाह मध्ये *110 सफ* (ओळी) बनतात. एका सफ मध्ये *275-300* मुस्लिम बांधव असतात. सर्वसाधारणपणे एका वेळी ईदगाह मध्ये *37000* पेक्षा जास्त मुस्लिम नमाजपठण करतात. *महापालिकेच्या* माध्यमातून "70 कर्मचाऱ्यांच्या" माध्यमातून *साफसफाई* करण्यात आली व "पट्टे" मारण्यात आले. ( ईदगाह मध्ये पट्टे मारण्यासाठी कर्मचाऱ्यांना तब्बल *14 तास* लागतात ) त्यामुळे महापालिकेचे देखील आभार -धन्यवाद !  

महापालिकेचा *रोडरोलर* गेले "सहा महिने" बंद असल्याने ईदगाह कमेटी चे *कर्तव्यदक्ष* संचालक आणि लोकाभिमुख *नगरसेवक इम्रान शेख* यांनी "खाजगी कॉन्ट्रॅक्टर" च्या माध्यमातून जमिनीचे *सपाटीकरण* केले. यावेळी नेहमीप्रमाणे *पोलीस खात्याने* देखील "चोख बंदोबस्त" ठेवला होता.

गत रमजान ईदच्या *कटू स्मृती* लक्षात घेता यंदा ईदगाह मध्ये "चंदा" घेण्यासाठी *चोख व्यवस्था* करण्यात आली. त्याचे "फलित" म्हणून 150 *स्वयंसेवकांमार्फत* यंदा 4 लाखापर्यंत चंदा जमा झाला. (*रमजान ईदला* अशाप्रकारे चंदा गोळा झाला असता तर तब्बल *8 लाख रुपये* गोळा झाले असते. ) असो,

चंदा गोळा करण्याची प्रक्रिया *उत्तमप्रकारे* व "काटेकोरपणे" पार पाडल्याबद्दल ईदगाह कमेटीचे सर्वत्र *अभिनंदन* होतं आहे.

ईदगाह मध्ये नमाजपठण काटेकोर होण्यासाठी बहुजन नेते *असिफ बावा* ,जब्बार बारसकर , निसार संगतरास, कय्युम पटवेगार तसेच अन्य कार्यकर्त्यांचे बहुमोल सहकार्य झाले .


 . *इकबाल बाबासाहेब मुल्ला* 

( *पत्रकार* )

संपादक - सांगली वेध

संपादक - वेध मीडिया न्यूज,सांगली.

*मोबाईल - 8983587160*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा