*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
तुळजापूर येथील शिवसैनिक अमोल जाधव यांची तुळजापूर तालुका शिवसेना (शिंदे गट) च्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली असून
ही निवड पक्षाचे उपनेते व माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन करण्यात आली. यावेळी चौगुले यांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
अमोल जाधव हे गेल्या काही काळात तुळजापूर तालुक्यातील राजकारणात ठळकपणे झळकलेले नाव ठरले आहे. संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरलेल्या तुळजापूर यात्रा मैदान या मुद्द्यावर त्यांनी सातत्याने आवाज उठवला. या विषयावर त्यांनी आंदोलने, निवेदने, मोर्चे यांद्वारे लक्ष वेधले. त्यांच्या या पाठपुराव्यामुळे धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी स्वतः यात्रा मैदानाची पाहणी करून लवकरच यात्रा मैदान उभारले जाईल, असे आश्वासन दिले होते. त्यांच्या या कार्याची पोच पावती म्हणून पक्षप्रमुख राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार तसेच पक्षाचे सचिव संजय मोरे व धाराशिव जिल्हा सहसंपर्कप्रमुख भगवान देवकते यांच्या मार्गदर्शनाखाली अमोल जाधव यांची तालुकाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लक्षात घेता शिवसैनिक कडून तालुकास्तरावर ही मोठी नियुक्ती करण्यात खळबळ उडाली आहे शिवसेनेची ताकद तालुक्यात वाढणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे
या निवडीबाबत "टाइम्स 45 न्यूज मराठी" शी बोलताना तालुकाध्यक्ष अमोल जाधव म्हणाले कि पक्षांनी दिलेल्या जबाबदारीनुसार तालुक्यात शिवसेना अधिक बळकट करणार असून अनेक नवे कार्यकर्ते आणि पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करणार असून विकासासाठी पक्षाच्या माध्यमातून मी कटिबद्ध असल्याचे सांगितले
याप्रसंगी शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे धाराशिव जिल्हा अध्यक्ष - मोहन पनुरे उमरगा तालुका अध्यक्ष गणेश नेपते, तुळजापूर तुळजापूर शहर उपाध्यक्ष रमेश चिवचिवे , चिमू भाई शेख तसेच बहुसंख्येने शिवसैनिक उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा