*अकलूज --प्रतिनिधी*
*केदार---- लोहकरे*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले माळशिरस तालुका यांच्या वतीने तालुका अध्यक्ष मिलिंद सरतापे यांनी वेळापूर सह तालुक्यातील विविध मागण्याचे निवेदन पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांना दिले.
अवकाळी पावसामुळे डाळिंब,आंबा,केळी,कांदा,ऊस या पिकांसह जनावरांच्या साऱ्याची मोठ्या प्रमाणात हानी झाली.फळबागां उध्वस्त झाल्याने बळीराजाचे आर्थिक नुकसान झाले असल्याने शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई मिळावी.वेळापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र असल्याने रुग्णांना अत्याधुनिक सोयीसुविधा अपुऱ्या पडत असल्याने वेळापूर येथे शंभर खाटांचे ग्रामीण रुग्णालय किंवा ट्रॉमा केअर सेंटर त्वरित मंजूर करावे व प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयामध्ये रूपांतर करावे.परिवहन विभाग अकलूज येथे नव्याने एसटी गाड्या उपलब्ध कराव्यात. वेळापूर येथे विद्यार्थी व परगावचे प्रवासी यांची गैरसोयस होत असल्याने वेळापूर येथे सर्व सोयुक्त सुसज्ज बस स्थानक मंजूर करावे तसेच सदाशिवनगर, जांबुड,लवंग सेक्शन,डी १९, महाळुंग येथील शेती महामंडळ व गायरान जागेतील अतिक्रमण नियमित करून गावठाणचा प्रलंबित असलेलाप्रश्न मार्गी लावावा व त्याच जागेवरती घरकुल बांधण्यासाठी परवाना मिळावा इत्यादी मागण्याचे निवेदन ग्रामविकास मंत्री, पंचायतराज तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांना त्यांच्या बोराटवाडी येथील निवासस्थानी भेटून दिले.
यावेळी तालुकाध्यक्ष मिलिंद सरतापे,तालुका सरचिटणीस मारुती खांडेकर, युवक आघाडी तालुका अध्यक्ष दशरथ नवगिरे,अंबादास खांडेकर,खांडेकर सर आदी उपस्थित होते.
*चौकोट*
वेळापूर येथे स्वतंत्र बस स्थानक
व्हावे व वाढत्या लोकसंख्येचा विचार करता रुग्णांना उपचार मिळत नसल्याने वेळापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयामध्ये रूपांतर करण्यात यावे तसेच गेली किती वर्षांपासून वेळापूर येथे एसटी महामंडळाची जागा असून वेळापूर येथे बस स्थानक अद्याप झाले नसल्याने वेळापूर येथे सर्व सोई युक्त सुसज्ज बस स्थानक व्हावे.
*मिलिंद सरतापे*
तालुकाध्यक्ष आरपीआय
(आठवले गट)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा