Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, ३ जुलै, २०२५

*खासदार-' प्रणिती शिंदे' यांनी घेतले श्री "गजानन महाराज" पालखीचे दर्शन*

 


*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-- 9730 867 448

*पाऊले चालती पंढरी ची वाट...*

*ओढ एकच पंढरीच्या पांडुरंगाला पाहण्याची....!*


शेगावचे संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन झाले असता मोहोळ तालुक्यातील वाघोली येथे खासदार प्रणिती शिंदे यांनी पालखी सोबत चालणाऱ्या असंख्य वारकऱ्यांचे आणि पालखीचे मनोभावे स्वागत करून दर्शन घेतले. सर्वांच्या सुख-समाधानासाठी व सोलापूरचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी साकडं घातलं. यावेळी तहान भूक हरपून डोळ्यात विठ्ठलाच्या दर्शनाची आणि भक्तिभावाची आस ठेऊन मैलोन-मैल पायी चालत भागवत संप्रदायाची भगवी पताका हाती घेऊन टाळमृदंगाच्या गजरात विठुनामाचा जप करत पंढरीच्या वाटेवर चालणाऱ्या पावलांसोबत चालताना मन धन्य होऊन गेलं. भक्तिपरंपरेचा आणि वारीच्या संस्कृतीने दिलेला एकात्मतेचा, भक्तिभावाचा, बंधुभावाचा वारसा असाच वृद्धिंगत व्हावा अशी भावना खासदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली.

यावेळी श्री गजानन महाराज संस्थान च्या वतीने खासदार प्रणिती शिंदे यांचे शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.




यावेळी मोहोळ तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सुलेमान तांबोळी, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष राजेश अप्पा पवार, रामचंद्र पतंगे, सरपंच नेताजी वाघमारे, जिल्हा कॉग्रेसचे समन्वयक मनोज यलगुलवार, रविंद्र राऊत, नागेश धसाडे, ज्ञानेश्वर पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा